23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

को.म.सा.प.मालवण तर्फे सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ऑनलाईन आदरांजली.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कोकण मराठी साहित्य परिषद शाखा ,मालवण’ तर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांनी गायलेल्या गाण्याचे गायन करुन आणि त्यांच्यावर कविता सादर करुन वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले, “लतादिदी अनंतात विलीन झाल्या नाहीत, तर पृथ्वीवरील एक स्वरतीर्थक्षेत्रच अंतर्धान पावले. लतादिदींना त्यांच्याच स्वराने श्रद्धांजली वाहण्याची कोमसापची संकल्पना ख-या अर्थाने भावांजली ठरणार आहे.” यावेळी विजय देसाई यांनी लताजींच्या गाण्याचे बासरीबादन करुन सुरुवात केली यानंतर कोमसापच्या सदस्यांनी आपल्या आवाजात लताजींची गाणी सादर केली. यात स्वराशा कासले (सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या), ऋतुजा केळकर (भय इथले संपत नाही, स्वरा अनिरुध्द आचरेकर (जेथे जातो तेथे तू माझा सांगाती), मंदार सांबारी (रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा), देवयानी आजगावकर (खेळ मांडीयेला), माधव गावकर (सुंदर ते ध्यान), अदिती मसुरकर (मोगरा फुलला), रवी पाटील (आनंदाचे डोहीं), हृदयनाथ गावडे (तुच कर्ता आणि करविता), सौ अनघा अभिजित नेरुरकर (माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई), आर्या अनिरुध्द आचरेकर (वृक्षवल्ली आम्हा सोयरे), सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर (हाची नेम आता), यशश्री ताम्हणकर (म्यानातून उसळे तलवारीची पात), अनुराधा आचरेकर (श्रावणात घन निळा), बाबाजी भिसळे (जन पळभर म्हणतील हाय हाय), रश्मी आंगणे (अखेरचा तुला दंडवत ), श्रावणी प्रभू (आता विसाव्याचे क्षण) यांनी गाणी सादर केली.
याचवेळी कोमसापच्या कवींनी आपल्या स्वरचित कवितांमधून लताजींना साहित्यिक स्वरांजली अर्पण केली. यात विजयकुमार शिंदे (सरस्वतीचा अवतार), मधुरा माणगांवकर (अभिवादन हे स्वरांजलीला), अदिती मसुरकर (गानसम्राज्ञी), रुजारिओ पिंटो (लता दिदी), रसिका तेंडोलकर (आनंदघन), बाबू घाडीगांवकर (श्रद्धासुमनें काय वहावी..), सुजाता टिकले (शब्द मुके झाले) यांनी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे संयोजन ऑनलाईन स्वरुपात गुरुनाथ ताम्हणकर, वर्षाराणी अभ्यंकर आणि कोमसाप सदस्यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'कोकण मराठी साहित्य परिषद शाखा ,मालवण' तर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांनी गायलेल्या गाण्याचे गायन करुन आणि त्यांच्यावर कविता सादर करुन वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले, “लतादिदी अनंतात विलीन झाल्या नाहीत, तर पृथ्वीवरील एक स्वरतीर्थक्षेत्रच अंतर्धान पावले. लतादिदींना त्यांच्याच स्वराने श्रद्धांजली वाहण्याची कोमसापची संकल्पना ख-या अर्थाने भावांजली ठरणार आहे.” यावेळी विजय देसाई यांनी लताजींच्या गाण्याचे बासरीबादन करुन सुरुवात केली यानंतर कोमसापच्या सदस्यांनी आपल्या आवाजात लताजींची गाणी सादर केली. यात स्वराशा कासले (सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या), ऋतुजा केळकर (भय इथले संपत नाही, स्वरा अनिरुध्द आचरेकर (जेथे जातो तेथे तू माझा सांगाती), मंदार सांबारी (रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा), देवयानी आजगावकर (खेळ मांडीयेला), माधव गावकर (सुंदर ते ध्यान), अदिती मसुरकर (मोगरा फुलला), रवी पाटील (आनंदाचे डोहीं), हृदयनाथ गावडे (तुच कर्ता आणि करविता), सौ अनघा अभिजित नेरुरकर (माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई), आर्या अनिरुध्द आचरेकर (वृक्षवल्ली आम्हा सोयरे), सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर (हाची नेम आता), यशश्री ताम्हणकर (म्यानातून उसळे तलवारीची पात), अनुराधा आचरेकर (श्रावणात घन निळा), बाबाजी भिसळे (जन पळभर म्हणतील हाय हाय), रश्मी आंगणे (अखेरचा तुला दंडवत ), श्रावणी प्रभू (आता विसाव्याचे क्षण) यांनी गाणी सादर केली.
याचवेळी कोमसापच्या कवींनी आपल्या स्वरचित कवितांमधून लताजींना साहित्यिक स्वरांजली अर्पण केली. यात विजयकुमार शिंदे (सरस्वतीचा अवतार), मधुरा माणगांवकर (अभिवादन हे स्वरांजलीला), अदिती मसुरकर (गानसम्राज्ञी), रुजारिओ पिंटो (लता दिदी), रसिका तेंडोलकर (आनंदघन), बाबू घाडीगांवकर (श्रद्धासुमनें काय वहावी..), सुजाता टिकले (शब्द मुके झाले) यांनी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे संयोजन ऑनलाईन स्वरुपात गुरुनाथ ताम्हणकर, वर्षाराणी अभ्यंकर आणि कोमसाप सदस्यांनी केले.

error: Content is protected !!