शिरगाव | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील फोंडा हरकुळ तेलीवाडीतील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम रामा खानविलकर ( वय – ७७ वर्षे ) यांचे बुधवार दि. १२ फेब्रु. रोजी सकाळी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. ते ‘बुधाजी आबा’ या नावाने सुपरिचित होते. त्यांना सामाजिक क्षेत्रात कामाची आवड होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने गावात शोक व्यक्त होत आहे. पत्रकार संतोष साळसकर यांच्या भावाचे ते सासरे होत.