ब्यूरो न्यूज : अभिनेत्री व समाजसेविका सौ. अक्षता कांबळी यांनी असलदे येथील दिवीजा आश्रमाला भेट देत ज्येष्ठांच्या सहवासात वाढदिवस साजरा केला व आर्थिक मदत केली. तिथले ज्येष्ठ नागरीक तसेच कर्मचारी यांनी सौ कांबळी यांना प्रार्थना , गप्पा गोष्टी, गाणी म्हणत भरभरून शुभेच्छा दिल्या.


यावेळी अनिल कांबळी, मीनल पाटील, अविनाश फाटक, संदेश शेटये असे मान्यवर उपस्थित होते. आश्रमाच्या वतीने सौ. अक्षता कांबळी यांना सन्मानचिन्ह व सदिच्छा देण्यात आल्या.