29.1 C
Mālvan
Thursday, May 8, 2025
IMG-20240531-WA0007

माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटूंच्या महाविद्यालयाला अनोख्या पद्धतीने सदिच्छा.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग महाविद्यालय हिरक महोत्सव समारोपाचे औचित्य.

मालवण : मालवण शहरातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हीरक महोत्सव समारोप समारंभ २६ एप्रिल रोजी संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर, बोर्डिंग ग्राऊंड येथे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयाचे ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू एकत्र आले आणि त्यांनी लेदरबाॅल क्रिकेट खेळून महाविद्यालयाला अनोख्या पद्धतीने सदिच्छा दिल्या. ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू व स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. नंदू देसाई यांची संकल्पना असलेल्या या उपक्रमाला अनेक माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटूंनी उत्साहात सहभाग घेतला. यावेळी, महाविद्यालयात १९८३-१९८४ च्या वर्षी विभागीय स्तरावरील अंतिम फेरीत पोचत इतिहास रचलेल्या संघातील खेळाडूंची विशेष उपस्थित होती.

यावेळी लेदरबाॅल क्रिकेटसाठी प्रतिकूल वातावरण असूनही यशस्वी ठरलेल्या माजी विद्यार्थी लेदरबाॅल क्रिकेट खेळाडूंनी त्यांनी बोर्डिंग ग्राऊंड मैदानावर घेतलेली मेहनत व त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्वांची विशेष आठवण काढली. आता महाविद्यालयातील क्रिकेटपटूंसाठी व क्रिकेटच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. टर्फ खेळपट्टी, जाळ्यांतील सराव, पॅवेलियन या व अशा घटकांमुळे क्रिकेट विकासासाठी खूप मोठी संधी निर्माण झाली असून या घटकाचा प्रामाणिकपणे व विनम्रपणे लाभ घ्यावा असे माजी विद्यार्थी तथा ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटूंनी आवाहन केले.

यावेळी या उपक्रमाचे संकल्पक नंदू देसाई यांच्यासह पप्पू परब, महेश कांदळगांवकर, विक्रम मोरे, जयंत गवंडी, शेखर आचरेकर, शेखर पाटकर, शंकर पराडकर, चिका फर्नांडिस, जितू वाळके, जयंत गवंडे, फ्रान्सिस डिसोझा, बाबा परब, दीपक धुरी, झहीर शेख़, विनायक पराडकर, महेन ढोलम, मंदार केणी, यतीन खोत, नीलकंठ मालणकर, चिन्मय पाटकर, भूषण म्हापणकर, परशुराम पाटकर, सिद्धार्थ जाधव, बंड्या वायंगणकर, क्रिकेट प्रशिक्षक आशिष परुळेकर, स. का. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, मालवणचे नागरीक उपस्थित होते.

अनेक वर्षांनंतर एकत्र येत पारंपरिक क्रिकेटच्या शिस्तीत, ज्येष्ठ खेळाडूंनी रणरणत्या उन्हामध्ये दिवसभर लेदरबाॅल क्रिकेट खेळून महाविद्यालयाला सदिच्छा देणे प्रशंसेचे ठरले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!