विशेष दुचाकी मिरवणुकीत बहुसंख्य माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सहभाग.
मालवण | ब्यूरो न्यूज : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार दि. २६ एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या हीरक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला माजी विद्यार्थी संघटनेकडून मालवण शहरातून स्वयंचलित दुचाकींवरुन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बहुसंख्य माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी उत्साहात सहभाग घेतला. दरम्यान, हीरक महोत्सव कार्यक्रम व माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी तसेच नागरीकांनी उपास्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

मालवण शहरातील देऊळवाडा येथून या मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. देऊळवाडा येथून भरड नाका ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ येथून सिंधुदुर्ग महाविद्यालय अशी ही रॅली काढण्यात आली.