मालवण : मालवण मधील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर,मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित मालवण तालुक्यातील खेळाडूंसाठी लेदरबाॅल क्रिकेटच्या उन्हाळी प्रशिक्षणाचा आज शुभारंभ झाला असून दि. २७ एप्रिल ते दि. ११ मे दरम्यान हे प्रशिक्षण शिबीर सकाळी ७.०० ते ९.३० या वेळात आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरात मुंबईतील नामवंत क्रिकेट खेळाडू तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमाणीत प्रशिक्षक श्री.आशिष परुळेकर प्रशिक्षण देणार आहेत.

या उन्हाळी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ क्रिकेटपटू व क्रिकेट संघटक जयंत गवंडे, बबन रेडकर, संदीप शिरोडकर, जहीर शेख़, संतोष वालावलकर, आत्माराम सुतार,अण्णा कारेकर, शेखर आचरेकर तसेच मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि शिबिरात सहभागी उदयोन्मुख क्रिकेटपटू व पालक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रशिक्षक आशिष परुळेकर यांनी सांगितले की या प्रशिक्षण शिबीरा दरम्यान इथले युवा क्रिकेटपटू पारखून त्यांना प्रशिक्षित करून उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी तयार करणे हा प्रमुख उद्देश आहे. हे प्रशिक्षण शिबिर सर्व खेळाडूंसाठी विनामूल्य आहे तसेच क्रिकेटचे सर्व आवश्यक साहित्य मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन कडून दिले जाईल.मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या समन्वयाने या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाचीही त्यांनी प्रशंसा केली.



या शिबिरातील सहभागी युवा क्रिकेटपटू खालीलप्रमाणे आहेत.
आयुष गांवकर, रितेश माणगावकर, मार्गी जुवेकर, आतिष राऊळ, राज सावजी,साहिल चव्हाण,सिद्धेश मायबा, पियुष वस्त,जय परब, तेजस मेस्त,भुवन सारंग, नील फर्नांडिस, निहाल पाटकर, पारस मेस्त्री, सुयश लांबोर, हर्षल मेस्त, आदीत्य परब, हितेश तुळसकर,गणेश चोपडेकर, करण बांदेकर, सुमित कोयंडे, देवाशिष जोशी, आदीत्य मेस्त्री, गीतेश बांबार्डेकर,विरेश पेडणेकर, अद्वैत टिकम,रूद्र कांबळी, अर्जुन नाटेकर,गजेंद्र मोरे, कुशल गावडे,प्रज्वल, आदित्य परुळेकर.