मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी, यशवंतराव भोंसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी, सावंतवाडी व यशवंतराव भोंसले पोलीटेक्निक
भोंसले नॉलेज सिटी , वझरवाडी , चराठा, सावंतवाडी
आणि ‘तिमिरातुनी तेजाकडे, ठाणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन या विषयावर बीकेसी ओडिटोरियम येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यासाठी श्री. सत्यवान य. रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क विभाग, भारत सरकार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.श्री. सत्यवान रेडकर सरांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ५० वे व्याख्यान पुष्प होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अच्युत सावंतभोसले, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. गजानन भोसले, डी. फार्मसीचे प्राचार्य श्री. सत्यजित साठे व विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या संधी, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम यासंबंधी योग्य मार्गदर्शन केले. या व्याख्यान प्रसंगी फार्मसी व पोलिटेक्निक महाविद्यालयाचे ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. मिलिंद देसाई व प्रा. ओंकार पेंडसे यांनी प्रयत्न घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर प्रभू यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद देसाई यांनी केले.