27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आय.पि.एल.महालिलावाची बोली पुकारणारे ह्यू एडमेडस यांना आय.पि.एल.लिलावादरम्यान आली चक्कर…!

- Advertisement -
- Advertisement -

क्रिडावृत्त | सुयोग पंडित : बेंगळुरु येथे 2022 आय.पि.एल. महालिलाव चालू असताना दरम्यान एक वेगळीच घटना घडल्याने महालिलावाची प्रक्रिया काहीकाळ स्थगित करुन दुपारच्या भोजनाच्या सत्राची घोषणा केली गेली.
महालिलावाची बोली पुकारणारे इंग्लंडचे ह्यू एडमेडस यांना बोली पुकारण्याच्या प्रक्रिये दरम्यान अचानक चक्कर आली. सुमारे तीन तास सलग बोली लावण्याच्या मॅरॅथॉन वाक्चातुर्यानंतर त्यांना शारिरीक शीण आल्याने त्यांना भोवळ आली असावी असा प्राथमिक कयास असून ह्यू एडमेडस हे आता शुद्धीवर असून त्यांच्या प्रकृतीच्या चिंतेची काळजी नसल्याचे डाॅक्टर्सनी सांगितले असल्याचे सूत्रांच्या आधारे समजते. दुपारी 03:30 वाजता महालिलाव पुन्हा एकदा सुरु होईल.
आय.पि.एल.च्या महालिलावात आत्तापर्यंत मुंबई इंडिअन्स व सनरायझर्स हैद्राबाद वगळता सर्व संघांनी खेळाडू खरेदीचे खाते उघडले आहे. लखनौ व अहमदाबाद या दोन नविन संघांचा या महालिलावात नव्यानेच प्रवेश झालेला असून आत्तापर्यंत 20 खेळाडूंची विविध संघांना विक्री झालेली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

क्रिडावृत्त | सुयोग पंडित : बेंगळुरु येथे 2022 आय.पि.एल. महालिलाव चालू असताना दरम्यान एक वेगळीच घटना घडल्याने महालिलावाची प्रक्रिया काहीकाळ स्थगित करुन दुपारच्या भोजनाच्या सत्राची घोषणा केली गेली.
महालिलावाची बोली पुकारणारे इंग्लंडचे ह्यू एडमेडस यांना बोली पुकारण्याच्या प्रक्रिये दरम्यान अचानक चक्कर आली. सुमारे तीन तास सलग बोली लावण्याच्या मॅरॅथॉन वाक्चातुर्यानंतर त्यांना शारिरीक शीण आल्याने त्यांना भोवळ आली असावी असा प्राथमिक कयास असून ह्यू एडमेडस हे आता शुद्धीवर असून त्यांच्या प्रकृतीच्या चिंतेची काळजी नसल्याचे डाॅक्टर्सनी सांगितले असल्याचे सूत्रांच्या आधारे समजते. दुपारी 03:30 वाजता महालिलाव पुन्हा एकदा सुरु होईल.
आय.पि.एल.च्या महालिलावात आत्तापर्यंत मुंबई इंडिअन्स व सनरायझर्स हैद्राबाद वगळता सर्व संघांनी खेळाडू खरेदीचे खाते उघडले आहे. लखनौ व अहमदाबाद या दोन नविन संघांचा या महालिलावात नव्यानेच प्रवेश झालेला असून आत्तापर्यंत 20 खेळाडूंची विविध संघांना विक्री झालेली आहे.

error: Content is protected !!