मालवण | विनीत मंडलीक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेविका सेजल परब व माजी नगरसेवक पंकज सादये यांच्या सहकार्याने वायरी येथील ‘शांताराम निवास’ या ठिकाणी मोबाईलक्रमांक आधार कार्डला लिंक करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला वायरी व प्रभाग क्रमांक 8च्या नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात ऐंशी नागरिकांनी आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून घेतला त्याच प्रमाणे काहींना त्यांचा जुना मोबाईल क्रमांक बदलून नवीन क्रमांक अपडेट करून देण्यात आला.
ज्या नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडता येत नाही अश्या नागरिकांना घरी जाऊन त्याचा मोबाईल क्रमांक लिंक करून दिला गेला .
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोस्ट कर्मचारी श्री अमोल माळकर( बागायत पोस्ट) ,कुमारी प्राची माळकर (देवबाग पोस्ट), आणि श्री विजय तरी (वायरी पोस्ट ) यांनी मोलाचे सहकार्य केले.त्याबद्दल त्यांचे ही नागरिकांनी व शिबिर आयोजकांनी आभार मानले.
माजी नगरसेविका तृप्ती मयेकर व सहकार्यांचीही उपस्थित नागरीकांनी प्रशंसा केली.