जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर व माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांचे दातृत्व…!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील (कै) डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनला जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर व माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या वतीने रुग्णांसाठी बेड व आरोग्य विषयक साहित्य देणगी स्वरूपात देण्यात आले. कल्याणकर फौंडेशनच्यावतीने बांदा व परिसरातील गरजू रुग्णांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.
श्वेता कोरगांवकर यांनी आपली मुलगी श्रिया कोरगांवकर हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ बेड दिला. तसेच माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामत मित्रमंडळाकडून १ बेड व कमोड खुर्चीसाठी २ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत, डॉ. प्रसाद कोकाटे, सावंतवाडी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डिंगणे उपसरपंच जयेश सावंत, विनेश गवस, सुनील धामापूरकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सचिव मनोज कल्याणकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद कामत यांनी यापुढेही फाऊंडेशनला वैद्यकीय मदतीसाठी आपल्याकडून सहकार्य राहील. फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीब, गरजू रुग्णांना अशाच प्रकारे सेवा द्यावी असे सांगितले. अध्यक्ष डॉ. दिलीप सावंत यांनी आभार मानले.
यावेळी कोणाला आर्थिक स्वरूपात मदत द्यायची असल्यास डॉ. संदीप कल्याणकर फाऊंडेशन , बँक ऑफ महाराष्ट्र बांदा शाखेत (खाते क्रमांक ६०३५०२२५८७० आयएफएसी कोड MAHB0000068) या खात्यावर जमा करावी असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.