25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारी पासून..!

- Advertisement -
- Advertisement -

वरवडे फणसनगर येथील भव्य मैदानावर चमकणार आघाडीचे क्रिकेटपटू..!

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळवलेली संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. ही स्पर्धा कलमठ प्रीमियर लीग व एक गांव एक संघ या स्वरूपात असून सदर क्रिकेट स्पर्धेला जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धा १४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान कणकवली आचरा मार्गवरील वरवडे फणसनगर येथील भव्य दिव्य मैदानावर पार पडणार आहे. ७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत कलमठ गावातील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी कलमठ प्रीमियर लीग चे सामने खेळविण्यात येणार आहेत. कलमठ प्रीमियर लीग मध्ये एकूण १० संघ सहभागी झाले आहेत कलमठ प्रीमियर लीग चे प्रथम पारितोषिक २१ हजार व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक ११ हजार व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, सर्वोत्तम खेळाडू व सामनावीर यासाठी रोख पारितोषिक व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एक गाव एक संघ या धर्तीवर होणारी लीग स्पर्धा याच वेळी पार पडणार आहे. याच प्रथम पारितोषिक ४० हजार व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक २० हजार रुपये व आकर्षक चषक त्या सोबत मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, सामनावीर यासाठी रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे.
संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ कणकवली उप सभापती मिलिंद मेस्त्री यांच्या उपस्थितित संपन्न होणार असून या स्पर्धेला माजी खासदार नीलेश राणें, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल,माजी मंत्री रविंद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा बैंक अध्यक्ष मनीष दळवी , जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावड़े,सभापती मनोज रावराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आधी उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेत जिल्ह्यातील क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदीप मेस्त्री यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!