बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक कलामंच कुडाळच्या वतीने भारतरत्न गानसम्राज्ञी कै.लता मंगेशकर व कोकणचा नटसम्राट दशावतारी लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम बॅरिस्टर नाथ पै विद्यालय एमआयडीसी कुडाळ येथे शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत आयोजित केला आहे. कै. लतादीदीने गायलेली काही अजरामर गाणी आमच्या कलामंचातील प्राथमिक शिक्षक सादर करणार आहेत . कै.लतादीदींना त्यांनी गायलेली गाणी गाऊन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. असे प्राथमिक शिक्षक कलामंचाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी सावंत व सचिव श्री संजय गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे व सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -