कणकवली | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी मातोश्री हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले की निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्वांनी काम करूया. एकसंघ आणि एकजुटीने कार्यरत राहून शिवसेनेला बळकटी देऊया, एकदिवस आपल्या लढ्याला नक्कीच यश मिळेल.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले की शिवसेना पक्ष सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पक्ष आहे. मात्र जनतेने दिलेला कौल मान्य करून येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम आपण करू.
माजी आमदार वैभव नाईक मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला त्यासाठी आपल्याला लढावेच लागेल. प्रत्येकाला संधी मिळत असते भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल त्यासाठी आपण काम करीत राहिले पाहिजे.
कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत म्हणाले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम यापुढेही आपण सुरु ठेवले पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडले पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असा विश्वास दिला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख निलम पालव,उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,उपतालुका प्रमुख बाबू पेडणेकर,आबू पटेल, जयसिंग नाईक,महिला तालुका संघटक वैदेही गाडेकर,उपतालुका संघटक संजना कोलते,युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग,तात्या निकम,धनश्री मेस्त्री,राजू राठोड, सचिन सावंत,तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, राजू रावराणे,विलास गुडेकर, धीरज मेस्त्री आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.