पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पोईप गावच्या विद्यार्थ्यांनी ॲबॅकस आणि वैदिक गणित राज्यस्तरीय स्पर्धेत भरीव यश संपादन केले आहे. ५ जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरूश्री एज्युकेशन ॲकडमी आयोजित ‘ॲबॅकस आणि वैदिक गणित’ स्पर्धेत पोईप गावातील जि. प. केंद्र शाळा नं . १ मधील विद्यार्थीनी कु. हार्दिका राजाराम पाटकर GK3 level च्या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सायकलची प्रथम मानकरी ठरली. तसेच सौ. इं. द. वर्दम हायस्कूल मधील कु. देवयानी गोपाळ पाचगे या विद्यार्थिनीने GK5 level स्पर्धेत दुसर्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवली. त्यांना गुरुश्री ॲबॅकस ॲकॅडमीचे संस्थापक श्री. अविनाश भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले .
याबद्दल पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल कांदळकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंभार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, केंद्र शाळा पोईपचे मुख्याध्यापक श्री. घाडीगांवकर सर, श्री. पाटील सर, शाळेतील इतर शिक्षक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांच्याकडून कौतुक होत आहे.