24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण प्रिमीअर लीगच्या चौथ्या वर्षीच्या हंगामाची घोषणा..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण स्पोर्टस् क्लब आयोजीत २०२२ सालची लेदरबाॅल स्पर्धा..!

२७ फेब्रुवारी ते ६ मार्च रंगणार सिंधुदुर्ग लेदरबाॅल क्रिकेटच्या पंढरीत मालवण प्रिमीअर लीग .

मालवण | (सुयोग पंडित) क्रीडावृत्त : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेटची पंढरी असलेल्या मालवण शहरातील टोपिवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंड मैदानावर मालवण प्रिमीअर लीगच्या चौथ्या वर्षीच्या हंगामाची घोषणा झाली आहे.
मालवण स्पोर्ट्सतर्फे क्लब आयोजित या ‘मालवण प्रीमियर लीग २०२२’ लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ते ६ मार्च २०२२ या कालावधीत खेळवली जाणार आहे.
स्पर्धेचे सर्व सामने टोपीवाला हायस्कूलच्या,खास लेदरबाॅलसाठी तैनात असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळविले जातील.


या मालवण प्रिमीअर लीग स्पर्धेची संघनिवड प्रक्रिया ‘लिलाव पद्धतीने’ करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज भरायचे आहेत.
प्रवेश अर्ज भरायची अंतिम मुदत दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ राहील.प्रवेश अर्ज ‘रवी मसाले,रामेश्वर कॉम्प्लेक्स ,भरड,मालवण येथे उपलब्ध आहेत. प्रवेश अर्जाची फी तथा शुल्क रुपये मात्र २०० राहील.


स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रु. ५५,५५५ असे असून द्वितीय पारितोषिक रोख रु. ३३,३३३ असे ठेवण्यात आले आहे.
संघ खरेदीसाठी तथा फ्रॅन्चायझी ओनरशिपसाठी इच्छुक असलेल्यांनी श्री.सौरभ ताम्हणकर +91 75885 64887, श्री. सुशील शेडगे यांच्याशी +91 74999 55147 संपर्क करावा असे आवाहन मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे करण्यात आले आहे.

.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण स्पोर्टस् क्लब आयोजीत २०२२ सालची लेदरबाॅल स्पर्धा..!

२७ फेब्रुवारी ते ६ मार्च रंगणार सिंधुदुर्ग लेदरबाॅल क्रिकेटच्या पंढरीत मालवण प्रिमीअर लीग .

मालवण | (सुयोग पंडित) क्रीडावृत्त : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेटची पंढरी असलेल्या मालवण शहरातील टोपिवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंड मैदानावर मालवण प्रिमीअर लीगच्या चौथ्या वर्षीच्या हंगामाची घोषणा झाली आहे.
मालवण स्पोर्ट्सतर्फे क्लब आयोजित या 'मालवण प्रीमियर लीग २०२२' लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ते ६ मार्च २०२२ या कालावधीत खेळवली जाणार आहे.
स्पर्धेचे सर्व सामने टोपीवाला हायस्कूलच्या,खास लेदरबाॅलसाठी तैनात असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळविले जातील.


या मालवण प्रिमीअर लीग स्पर्धेची संघनिवड प्रक्रिया 'लिलाव पद्धतीने' करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज भरायचे आहेत.
प्रवेश अर्ज भरायची अंतिम मुदत दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ राहील.प्रवेश अर्ज 'रवी मसाले,रामेश्वर कॉम्प्लेक्स ,भरड,मालवण येथे उपलब्ध आहेत. प्रवेश अर्जाची फी तथा शुल्क रुपये मात्र २०० राहील.


स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रु. ५५,५५५ असे असून द्वितीय पारितोषिक रोख रु. ३३,३३३ असे ठेवण्यात आले आहे.
संघ खरेदीसाठी तथा फ्रॅन्चायझी ओनरशिपसाठी इच्छुक असलेल्यांनी श्री.सौरभ ताम्हणकर +91 75885 64887, श्री. सुशील शेडगे यांच्याशी +91 74999 55147 संपर्क करावा असे आवाहन मालवण स्पोर्टस् क्लबतर्फे करण्यात आले आहे.

.

error: Content is protected !!