डाॅ. सविता तायशेटे यांचा आरोग्यलक्ष्मी पुरस्काराने होणार सन्मान.
डाॅ अनघा सबनीस व वंदना करंबेळकर यांची माहिती.
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी तालुक्यातील निरामय विकास केंद्र, कोलगाव या संस्थेचा २० वा वर्धापनदिन १८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमात कणकवली येथील डाॅ. सविता तायशेटे यांना आरोग्यलक्ष्मी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमात, मुलाखतकार प्रसाद घाणेकर हे डॉ. सविता तायशेटे यांची विशेष मुलाखत घेणार आहेत.

यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच पाककृती व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. निमंत्रक डॉ अनघा सबनीस व वंदना करंबेळकर यांनी संस्थेच्या वतीने ही माहिती दिली असून उपस्थितीचे आवाहन केले आहे.