१ लाख २५ रुपयांचे प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक तर ५० हजार पंचवीस रुपयांचे द्वितीय पारितोषिक व आकर्षक चषक ; २५ एप्रिल पर्यंत नांव नोंदणीची मुदत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत भव्य ‘एक गाव
‘एक नगरपंचायत’ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या होडावडा (ता. वेंगुर्ले) येथील चव्हाटा मंदिर जवळील दळवी वाडी मैदानावर
दळवीवाडी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत ही स्पर्धा भव्य ‘एक गाव एक नगरपंचायत’ स्वरुपाची आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क १२००/_ रुपये असून दिनांक २५ एप्रिल २०२५ पर्यंत नांव नोंदणीची मुदत आहे. पहिल्या १६ संघांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाईल असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

दळवीवाडी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ चे प्रथम पारितोषिक एक लाख पंचवीस रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ५०हजार २५ रुपये व आकर्षक चषक असे असून इतर आकर्षक वैयक्तिक पारितोषिकांची रेलचेल आहे.
दळवीवाडी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ स्पर्धा, नियम व संबंधित अधिक माहितीसाठी, श्री. नितेश दळवी 9637795408, श्री. रोशन दळवी 9765929161, श्री. दर्शन सावंत 9765859308 यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती देण्यात आली आहे.