शिरगांव | संतोष साळसकर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती जवळ , कणकवली येथे शनिवार दि .१९ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित केला आहे . आपणही सर्वानी या उत्सवास उपस्थित रहावे .शिवजयंती निमित्त खालील स्पर्धा आयोजित केल्या आहेत.स्पर्धा क्र .१ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा गट व विषय पुढील प्रमाणे गट क्र .१ इ .५ वी पर्यंत -शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग गट क्र .२ इ .६वी ते ८ वी- मी किल्ला/दुर्ग बोलतोय गट क्र .३ इ.९ वी ते १२ वी -छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि गनिमी कावा गट क्र.४ महाविद्यालयीन गट शिवरायांचं व्यापारी आणि शेती धोरण बक्षिसे रोख पुढीलप्रमाणे प्रथम -१००० रु द्वितीय-७०० रु. तृतीय-५०० रु वक्तृत्व स्पर्धा सकाळी ११ .०० वाजता सुरू होईल.वक्तृत्व स्पर्धा वेळ मर्यादा खालील प्रमाणे-गट क्र .१- ४ते५ मिनिटे
गट क्र .२- ५ते ६ मिनिटे
गट क्र .३- ६ते ७ मिनिटे
गट क्र.४- ६ ते ७ मिनिटे नाव नोंदणी साठी संतोष देसाई -9405328242 सचिन सावंत -9021858597 यांच्याशी संपर्क करावा.चित्रकला स्पर्धा -गट-अ इयत्ता ५ वी पर्यंत-
विषय-“सिंधुदुर्ग किल्ला किंवा शिवाजी महाराज “गट -ब इयत्ता ६ वी ते ८ वी
विषय-“शिवाजी महाराजांचे सिंहासन आरूढ व्यक्तिचित्र किंवा माझा आवडता किल्ला”रोख बक्षिसे पुढीलप्रमाणे गट अ व ब साठी प्रथम-५००,द्वितीय-३००,तृतीय-२००
सदर चित्रकला स्पर्धा सकाळी ११.३० ते १.०० या वेळेत होईल चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी
श्री हेमंत राणे-9404169984
संतोष राणे -9881104804
यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेचे ठिकाण-छत्रपती शिवाजी महाराज चौक,(पंचायत समिती जवळ)कणकवली सर्व विजेत्यांचे बक्षिस वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतील . बक्षिसाचे स्वरूप सन्मानचिन्ह , रोख रक्कम व
सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.तरी जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी अशी विनंती आहे .नाव नोंदणी १७ फेब्रुवारी २०२२ पर्यत करावी सर्व स्पर्धकांनी कोविड-19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.
फोटो : गुगल सौजन्य