मालवण |विशेष वृत्त : दिनांक 10 ऑगस्ट रोजी आपली सिंधुनगरी माध्यम यंत्रणेचा औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
कुंभारमाठ मालवण येथील हाॅटेल जानकी येथील मुख्य सभागृहात हा विशेष सोहळा आयोजित केला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅन्केच्या माजी अध्यक्ष श्रीमती सुगंधा साटम रावराणे यांनी सोहळ्याच्ये अध्यक्षपद भूषविले. तसेच म्हणून मुख्य अतिथी म्हणून मालवणचे व्यावसायिक व माजी नगरसेवक श्री जाॅन नरोन्हा, मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संतोष गावडे, शूटींग बाॅल कोच व एथलेटीक्स एक्सपर्ट श्री अशोक दाभोळकर, माजी सि आर पि एफ सेवाव्रती सौ.फुला मंडलिक आणि आपली सिंधुनगरी चॅनेलचे संचालक श्री विजय रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार नरेंद्र परब व पत्रकार श्रीकांत देसाई यांच्या स्मृती मंचावर आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वाती हळदणकर (शिक्षिका,रोझरी इंग्लिश स्कूल,मालवण) यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती सुगंधा साटम रावराणे यांनी उपस्थितांना आणि आपली सिंधुनगरीच्या टीमला मौलिक मार्गदर्शनपर भाषण केले.
तसेच तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संतोष गावडे यांनी उपस्थित पत्रकार ,प्रतिनिधी आणि इतरांना आपला पेशा व आरोग्याविषयीची जाणिव जागृती करुन देत चॅनेलला शुभेच्छा दिल्या.श्री जाॅन नरोन्हा यांनी आजची सामाजिक स्थिती व त्यावर करता येऊ शकणारी शोधपत्रकारीता यांवर आपले मत व्यक्त केले. श्री अशोक दाभोळकर यांनी क्रिडाविषयक पत्रकारीता आणि ध्येयधोरणांवर त्यांचे विचार मांडत सर्वांना शुभेच्छा दिल्या.सौ फुला मंडलिक यांनी सिंधुदुर्गातील युवा वर्ग,रोजगार आणि सक्षमतेवर भर देत चॅनेलच्या टीमचे स्थानिक पातळीवर धैर्य वाढविण्याची गरज स्पष्ट केली.संचालक श्री विजय रावराणे यांनी चॅनेलची यंत्रणा स्पष्ट करत आणि कार्यालयीन कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पत्रकार श्री प्रफुल्ल देसाई,पत्रकार श्री संदीप बोडवे, रोटरी क्लबचे श्री रतन पांगे ,सौ गीता पांगे, युवा काॅन्ग्रेसच्या पल्लवी तारी ,गीतांजली जोशी , माजी जि.प.मुख्याध्यापिका तारीबाई, सचिन हरमळकर,श्री. महेंद्र करंगुटकर, देवबाग हायस्कूलचे श्री रंजन तांबे , व्यावसायिक श्री मोसीन शेख़,नझीरा शेख़ , श्री सलीम ख़ान, श्री हमीस ख़ान , सौ.वंदना रावराणे,सौ पेरपेच्युअल फर्नांडीस, डायना डिसोजा, सौ मृदुला केणी , दाभोळी गावचे माजी सरपंच श्री बोवलेकर वगैरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
कोविड तथा कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.
चॅनेलतर्फे संस्थापक व मुख्य संपादक श्री सुयोग पंडित यांनी चॅनेलची संकल्पना स्पष्ट केली.
तसेच चॅनेलच्या संचालक मंडळातील सौ.फिलोमीना पंडित, प्राध्यापक दिनेश किडये ,श्री विजय रावराणे यांची उपस्थिती होती.
झुब क्रिएशन ,मालवण हे सदर कार्यक्रमाचे मिडिया पार्टनर होते. झुब क्रिएशनचे सर्वेसर्वा श्री जुबेर ख़ान यांनी सदर इव्हेंट तथा कार्यक्रमाची आखणी केली होती.
आपली सिंधुनगरी चॅनेलतर्फे वृत्तनिवेदक सिद्धेश चव्हाण, निवेदिका मृणाली शिंदे , डिजिटल क्रिएटर दर्शना लाकडे,प्रतिनिधी वैभव माणगांवकर, उमेश परब , संतोष साळसकर, विवेक परब व मिलिंद माणगांवकर, सहिष्णू पंडित आदींच्या योगदानातून हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
शुभेच्छा व आभार.
फारच सुंदर उदघाटन सोहळा. शुभेच्छा.