25.5 C
Mālvan
Sunday, November 24, 2024
IMG-20240531-WA0007

असलदे उगवतीवाडीत गणेश जयंती आणि सत्यनारायण पूजेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सिंधुदुर्ग ब्युरोचीफ उमेश परब यांचे अडिच तास बहारदार सूत्रसंचालन..

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे उगवतीवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश जयंती उत्सव २०२२ व सत्यनारायण पूजेनिमित्त आयोजित धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.तसेच असलदे सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके पुरस्कृत ‘खेळ पैठणीचा’ या होम मिनिस्टर या स्पर्धेत मधुरा मनोज लोके प्रथम विजेत्या ठरत पैठणीच्या मानकरी ठरल्या,तर उपविजेती दिया दिवाकर डगरे,तृतीय विजेती स्नेहा संदेश आचरेकर ठरल्या.
ब्राम्हणदेव सेवा मंडळ , असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंतीनिमित्त गणेश पुजन,सामुहिक अभिषेक,श्री. सत्यनारायणाची महापुजा, महाआरती,भाविकांना महाप्रसाद,महिलांसाठी हळदीकुंकू संभारभ, सांस्कृतिक कार्यक्रम,मान्यवरांचे सत्कार,सुमधुर संगीत भजन,स्थानिक वारकरी भजने असे कार्यक्रम पार पडले. गांगो-ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ शेवरे तांबळवाडी बुवा – वैभव घाडीगांवकर व लिंगेश्वर प्रासादीक भजन मंडळ जानवली
बूवा रविकांत राणे यांनी संगीत भजन करत हरिनामातुन समाज प्रबोधन केले.
ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने समाजसेवक शेखर सोनार,शिवसेना नेते संदेश पारकर,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,सरपंच पंढरी वायंगणकर,जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर,संतोष राऊळ,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके,सोसायटी व्हा.चेअरमन दयानंद हडकर,आयनल सोसायटी चेअरमन भालचंद्र साटम,बुवा रविकांत राणे-जाणवली,बुवा-वैभव घाडीगांवकर शेवरे,त्यात्या निकम,अनिल तांबे,स्वामी मठ हडपीड दत्ताराम राणे,श्री मोरजकर,पपी सापळे, पपी वागणकर,ग्रामसेवक आर.डी. सावंत यांच्यासह विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांचा मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
होम मिनिस्टर ‘खेळ पैठणीचा’स्पर्धेत ३० महिलांनी सहभाग घेतला होता. सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार व आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सिंधुदुर्ग ब्युरोचीफ श्री. उमेश परब यांनी अडीच तास उपस्थितांचे मनोरंजन करत ५ फेरीत होम मिनिस्टर ही स्पर्धा खेळवली. अंतिम स्पर्धेच्या निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रथम विजेत्या मधुरा लोके यांना आकर्षक पैठणी, द्वितीय विजेता दिया डगरे यांना ५ लिटरचा कुकर, तृतीय विजेत्या स्नेहा आचरेकर यांना ३ लिटरचा कुकर देत माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम व पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी आयनल सोसायटी चेअरमन भालचंद्र साटम,हनुमंत वाळके,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच लक्ष्मण लोके,सुरेश लोके,गणेश लोके,रामचंद्र जेठे,प्रदीप हरमलकर,राकेश आचरेकर,संदेश आचरेकर,दयानंद डगरे,सचिन लोके,नितीन आचरेकर, महेश लोके,दिवाकर डगरे,पंकज आचरेकर,प्रकाश आचरेकर,विश्राम लोके,अनिल लोके, राजू जेठे,दिनेश जंगले,विष्णू डगरे,विजय आचरेकर,विशाल जेठे,संजय जेठे, सचिन हरमलकर, मनोज लोके,जितेंद्र लोके,सुरेश जेठे,अनिल कोठारकर,प्रशांत लोके यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. हा गणेश जयंती उत्सव मंडळाच्या जेष्ठ,युवक व महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वी झाले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सिंधुदुर्ग ब्युरोचीफ उमेश परब यांचे अडिच तास बहारदार सूत्रसंचालन..

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे उगवतीवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश जयंती उत्सव २०२२ व सत्यनारायण पूजेनिमित्त आयोजित धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.तसेच असलदे सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके पुरस्कृत 'खेळ पैठणीचा' या होम मिनिस्टर या स्पर्धेत मधुरा मनोज लोके प्रथम विजेत्या ठरत पैठणीच्या मानकरी ठरल्या,तर उपविजेती दिया दिवाकर डगरे,तृतीय विजेती स्नेहा संदेश आचरेकर ठरल्या.
ब्राम्हणदेव सेवा मंडळ , असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंतीनिमित्त गणेश पुजन,सामुहिक अभिषेक,श्री. सत्यनारायणाची महापुजा, महाआरती,भाविकांना महाप्रसाद,महिलांसाठी हळदीकुंकू संभारभ, सांस्कृतिक कार्यक्रम,मान्यवरांचे सत्कार,सुमधुर संगीत भजन,स्थानिक वारकरी भजने असे कार्यक्रम पार पडले. गांगो-ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ शेवरे तांबळवाडी बुवा - वैभव घाडीगांवकर व लिंगेश्वर प्रासादीक भजन मंडळ जानवली
बूवा रविकांत राणे यांनी संगीत भजन करत हरिनामातुन समाज प्रबोधन केले.
ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने समाजसेवक शेखर सोनार,शिवसेना नेते संदेश पारकर,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,सरपंच पंढरी वायंगणकर,जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर,संतोष राऊळ,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके,सोसायटी व्हा.चेअरमन दयानंद हडकर,आयनल सोसायटी चेअरमन भालचंद्र साटम,बुवा रविकांत राणे-जाणवली,बुवा-वैभव घाडीगांवकर शेवरे,त्यात्या निकम,अनिल तांबे,स्वामी मठ हडपीड दत्ताराम राणे,श्री मोरजकर,पपी सापळे, पपी वागणकर,ग्रामसेवक आर.डी. सावंत यांच्यासह विविध सामाजिक,राजकीय क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांचा मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
होम मिनिस्टर 'खेळ पैठणीचा'स्पर्धेत ३० महिलांनी सहभाग घेतला होता. सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार व आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे सिंधुदुर्ग ब्युरोचीफ श्री. उमेश परब यांनी अडीच तास उपस्थितांचे मनोरंजन करत ५ फेरीत होम मिनिस्टर ही स्पर्धा खेळवली. अंतिम स्पर्धेच्या निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रथम विजेत्या मधुरा लोके यांना आकर्षक पैठणी, द्वितीय विजेता दिया डगरे यांना ५ लिटरचा कुकर, तृतीय विजेत्या स्नेहा आचरेकर यांना ३ लिटरचा कुकर देत माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम व पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी आयनल सोसायटी चेअरमन भालचंद्र साटम,हनुमंत वाळके,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच लक्ष्मण लोके,सुरेश लोके,गणेश लोके,रामचंद्र जेठे,प्रदीप हरमलकर,राकेश आचरेकर,संदेश आचरेकर,दयानंद डगरे,सचिन लोके,नितीन आचरेकर, महेश लोके,दिवाकर डगरे,पंकज आचरेकर,प्रकाश आचरेकर,विश्राम लोके,अनिल लोके, राजू जेठे,दिनेश जंगले,विष्णू डगरे,विजय आचरेकर,विशाल जेठे,संजय जेठे, सचिन हरमलकर, मनोज लोके,जितेंद्र लोके,सुरेश जेठे,अनिल कोठारकर,प्रशांत लोके यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. हा गणेश जयंती उत्सव मंडळाच्या जेष्ठ,युवक व महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याने कार्यक्रम यशस्वी झाले आहेत.

error: Content is protected !!