शिवसेना ( उ. बा. ठा. ) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा पुन्हा जोमाने उतरुन विजयी होण्याच पत्रकार परीषदेत विश्वास .
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण कार्यालय येथे आयोजीत पत्रकार परीषदेत सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव झाला असला तरी कोणत्याही शिवसैनिकांनी नाराज होऊ नये. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा जोमाने उतरून आम्ही निश्चितच यश मिळवू असा विश्वास देखिल शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करणार.
आमदार वैभव नाईक यांचा तालुका शिवसेनेच्या वतीने लवकरच लढवय्या आमदार म्हणून जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचेही हरी खोबरेकर यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, उमेश मांजरेकर, सन्मेष परब, निनाक्षी शिंदे मेथर, उमेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, किशोर गावकर, सुरेश माडये उपस्थित होते.
श्री हरी खोबरेकर खोबरेकर म्हणाले की लोकसभेच्या निकालानंतर काल झालेल्या विधानसभेच्या निकालामध्ये मोठा फरक महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला. या फरकामध्ये महाविकास आघाडीच्या बऱ्याच जागा कमी झाल्या. त्यात जिल्ह्यातही ज्या तीन जागा ठाकरे शिवसेना पक्षाच्या होत्या. या तिन्ही जागांवर आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. परंतु हा जरी पराजय असला तरी कुडाळ मालवणची जी लढत होती. या लढतीमध्ये सुमारे ७३ हजार मतदारांनी वैभव नाईक यांना मतदान केले. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने, शिवसैनिकाने जीवाचे रान करून काम केले. या कामाची पोचपावती म्हणून सुमारे ७३ हजाराहून अधिकचे मतदान केले. विजयासाठीचे जी फिगर आवश्यक होती ती गाठू शकलो नाही याचे शल्य आहेच. परंतु प्रत्येक कार्यकर्ता लढला. आमदारांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. मालवण तालुक्यात साडे चार हजाराचे मतदान कमी झाले असले तरी कोणत्याही कार्यकर्त्याने नाराज होण्याचे कारण नाही. प्रत्येकाने लढाऊ वृत्तीने काम केले आहे. जय पराजय हे राजकारणात होत असतात. परंतु हे शल्य जर भरून काढायचे असेल तर आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याच ताकदीने ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करत पुन्हा एकदा मैदानात उतरावे लागेल. या मैदानात उतरल्यानंतर आपल्याला जिंकण्यासाठी लढावे लागेल. आज आमदार वैभव नाईक सर्वांसोबत त्याच ताकदीने सोबत आहेत. राज्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानून काम करत आहोत. आजचा काळ कठीण असला तरी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याची वेळ आहे. लोकसभेचा निकाल बघितल्यावर अजित पवारांच्या ज्या दोन चार जागा निवडून आल्या होत्या. त्याच पवारांच्या विधानसभेच्या निवडणुकीत ४१ जागा निवडून आल्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी राजकारण पलटू शकते आणि पुन्हा एकदा वेगळी सुरवात होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी नाराज न होता एका आशेच्या किरणाने ज्याप्रमाणे पडझड झाली अशी पडझड अनेक वर्षे पाहिली आहे. शिवसेना जसा सत्तेत कमी काळासाठी राहिला. परंतु आज आम्ही हक्काचे आमदार गमावले. त्याचे शल्य सुद्धा आम्हाला आहे. प्रत्येकाच्या घराघरात जाणारे, सुखदुःखात सहभागी होणारे, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमदार पराभूत झाले. या पराभवाचा जर वचपा काढायचा असेल तर येणाऱ्या काळात बूथ निहाय चांगले काम करण्याची गरज आहे. ते काम आपल्या हातातून घडेलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार वैभव नाईक यांचे आम्ही खरेच कौतुक करतो. एकीकडे अनेक सत्तास्थाने असताना अनेक लोक त्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. परंतु बाळासाहेबांशी, उद्धव ठाकरे, मातोश्रीशी ठामपणे प्रामाणिक राहिले. अनेक चौकशी त्यांच्या झाल्या. मात्र त्यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे सिद्ध झाले. ही आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी गर्वाची बाब आहे. त्यामुळे अशा नेत्याच्या पाठीशी आगामी काळातही आपण ठाम राहूया. वैभव नाईक हे लढाऊ वृत्तीने लढले आहेत. म्हणून येणाऱ्या काळात त्यांची साथ आपल्याला असणारच आहे. लवकरच वैभव नाईक यांचा लढाऊ आमदार म्हणून जाहीर सत्कार तालुका शिवसेनेच्या वतीने करणार आहोत. एक लढवय्या आमदार कसा असावा. एखाद्या बलाढ्य शक्तीसमोर लढणारा आमदार आज जनतेने पाहिला. वैभव नाईक यांचा हा पराभव नाही. ७३ हजाराहून अधिक जनतेने पाठीशी राहत तुम्ही लढत राहा. जिंकणे, हरणे ही बाब बाजूला ठेऊन तुम्ही लढत रहा असे जनतेने सांगितले आहे. तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची साथ यापुढेही वैभव नाईक यांना असणार आहे. येणाऱ्या काळात ज्या मतदारांनी मतदान केले. त्यांचे ऋण व्यक्त करतानाच त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी पाच वर्षांच्या काळात जे जे जनतेसाठी करता येईल. ज्याठिकाणी अन्याय होईल. त्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे काम ठाकरे शिवसेनेच्या वतीने केले जाईल. जनतेचे आशीर्वाद यापुढेही आमच्या पाठीशी राहोत असेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.