मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा भारती आणि पतंजली योग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशात १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव ह्या माध्यमिक शाळेत ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० वाजता सर्व मुलानी प्रत्येकी चार सूर्यनमस्कार घातले. स्वतः नित्यनेमाने योगासने व सूर्यनमस्कार घालणारे आणि योगासनांची शास्त्रशुध्द माहिती असलेले प्रशालेचे एक उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी मुलांना सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगून, सूर्यनमस्कार व योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. शाळेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेमध्ये विविध शालोपयोगी अभ्यासपूरक तथा व्यवसायाभिमूख उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. शाळेचा हिरकमहोत्सव व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अलौकिक क्षणाचे औचित्य साधून मुलांचे आरोग्य निरोगी राहावे, त्याचप्रमाणे मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी आठवड्यातून तीन दिवस प्रत्येकी एक तास योगासने व सूर्यनमस्कार हा विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांसाठी शाळेच्या संस्थेने प्रोत्साहन दिलेले असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनवीन उपक्रम करण्याचा शाळेचा प्रयत्न राहणार आहे, असे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सांगितले.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -