24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गायगोठण गणपती देवस्थानतर्फे सौ.प्रियांका भोगले आणि सौ.रश्मी आंगणे यांचा पुरस्कार प्राप्तीबद्दल सत्कार..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरातील माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने, श्री गायगोठण गणपती मंडळ देवस्थानच्या वतीने चाफेड गावच्या सौ प्रियांका विजय भोगले यांना यंदाचा रोटरी क्लब, सिंधुदुर्ग च्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच चाफेड-भोगलेवाडी प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.रश्मी रामचंद्र आंगणे यांना देखील यंदाचा अखिलभारतीय साने गुरुजी कथामला मालवण आयोजित कै. जी. टी. गांवकर सेवामयी आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल या दोघांचेही देवस्थान समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या पुरस्काराबद्दल सौ.प्रियांका भोगले यांनी सांगितले की,आजवर त्यांनी कधीच पुरस्कार मिळावा म्हणून काम केले नाही. त्यांना वडिलांची चांगली शिकवण,संस्कार मिळाले. तर लग्नानंतर त्यांच्या पतीनेसुद्धा त्यांना नेहमीच पाठिंबा, सहकार्य,मार्गदर्शन,प्रोत्साहन दिले.त्यांनी हार्मोनियम शिकवले. घरच्या लोकांनी गणेशाच्या साक्षीने माझा हा सत्कार केला याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. सौ.रश्मी आंगणे यांनी सर्व ग्रामस्थांचे वेळोवेळी खूप मोलाचे सहकार्य मिळाले.त्यांचे दातृत्व आणि कर्तृत्व खूप मोठे आहे असे सांगत सर्वांचे आभार मानले.
यावेळी हरकुळ बुद्रुक चे केंद्रप्रमुख चाफेड गावचे सुपुत्र विजय नारायण भोगले यांच्या संकल्पनेतून चाफेड भोगलेवाडी शाळेच्या आवारात उत्पन्न देणाऱ्या झाडांची वृक्षलागवड आणि ठिबकसिंचन करण्याची योजना आखली. त्याला सर्व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी भोगलेवाडीत यंदा नव्याने स्थापन झालेल्या बाल गणेश भजन मंडळातील सर्व बालवारकरी यांना स्वखर्चातून भगव्या रंगाचे सदरे वाटप केले,कोरोना काळात त्यांनी सर्वांना मोफत मास्कचेही वाटले होते. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ कांडर,सरचिटणीस ,माजी सरपंच सत्यवान भोगले,केंद्रप्रमुख सौ.वर्षा लाड,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विजय परब,बापू कांडर,सागर कांडर,श्रीपत परब यांनी सत्कारमूर्तीबद्दल मनोगते मांडली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ कांडर,उपाध्यक्ष महेश भोगले,खजिनदार सत्यवान कांडर,सरचिटणीस सत्यवान भोगले,मुंबई ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गोविंद उर्फ बापू कांडर,उपाध्यक्ष प्रकाश राणे,सेक्रेटरी सागर कांडर,सहसेक्रेटरी संतोष राणे,खजिनदार रामदास भोगले,पनवेल येथील सहाय्यक शिक्षिका सौ. धनश्री मयेकर,भजन मंडळाचे अध्यक्ष दिनकर घाडी,पोलीस पाटील संतोष सावंत,माजी सरपंच संतोष साळसकर,माजी पोलीस पाटील आबा राणे आदींसह देवस्थानचे पदाधिकारी,ग्रामस्थ, महिलावर्ग,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!