मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे देऊळवाडा येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा चंद्रकांत तुकाराम सावंत यांच्या घरी पालेभाजी असलेला मुळा गणपतीच्या आकारात सापडला आहे.
मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत सावंत यांच्या पत्नीने घरात जेवणासाठी आणलेल्या पालेभाजीतल्या मुळ्याला गणपतीचा आकार असल्याचे तिच्या लक्षात आल्याने सावंत दांपत्याने तो मुळा जेवणात न वापरता त्या गणेशेरुपी मुळ्याचे विधिवत पूजा अर्चा करुन नैवेद्य दाखवला.
चंद्रकांत सावंत हे मुळातच विठ्ठल भक्त तसेच भजनी बुवा असल्याने त्यांच्या मुखी नेहमी “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी”, हा अभंग असायचा आणि त्यामुळेच त्यांना कदाचित मुळ्यातून भगवंताने दर्शन दिले असावे असे ते मनोभावे भाविकांना सांगतात. त्याच्या घरी असलेल्या या मुळारुपी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आजू बाजूच्या लोकांची गर्दी होत आहे. चार पाच दिवस उलटून गेले तरीही हा मुळा जराही कोमेजलेल्या दिसत नाही. त्यामुळे त्याचे विसर्जन न करता माघी गणेश जयंती दरम्यान पर्यंत त्याची पूजा करण्याची त्यांचा मानस आहे.