जिल्हास्तरीय रेकाॅर्ड डान्स, आमने सामने डबलबारी, दशावतारी नाट्यप्रयोग, नेत्र तपासणी शिबीर खास आकर्षण..!
चिंदर | विवेक परब : श्री माघी गणेश जयंती उत्सव आचरा हिर्लेवाडी येथील पंढरीनाथ मंदिर येथे शुक्रवार दि. ४फ्रेबुवारी ते ८ फेब्रुवारी असा विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. शुक्रवारी सकाळी श्री गणेशाच्या विधिवत पूजेने उत्सवाला प्रारंभ होत असून दुपारी आरती व महाप्रसाद, रात्री स्थानिक कलाकारांची भजने असा कार्यक्रम होईल.
शनिवारी सकाळी विधीवत पूजा, संध्याकाळी दिंडी भजन व रात्रौ जिल्हास्तरीय रेकाॅर्ड डान्स स्पर्धा होईल. रविवारी सकाळी पूजा, सत्यनारायणाची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व रात्री आमने सामने डबलबारीचा सामना होणार आहे. सोमवारी नेत्र तपासणी शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व रात्रौ दशावतारी नाट्यप्रयोग होईल तर शेवटच्या दिवशी पूजा आरती व महाप्रसाद व संध्याकाळी समुद्रतिर्थ येथे गणेश विसर्जन असा साजरा होणार आहे तरी भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून लाभ घ्यावा असे आवाहन माघी श्री गणेश जयंती उत्सव (रजि.) हिर्लेवाडी यांनी केले आहे.