23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचे 2022/2023 साठीचे प्रवेश सुरु…!

- Advertisement -
- Advertisement -

25 वर्षांची गौरवशाली यशस्वी परंपरा असलेली ख्यातनाम शिक्षणसंस्था.

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथिल सुप्रसिद्ध शिक्षणसंस्था म्हणून नांवलौकीक असलेल्या रोझरी इंग्लिश स्कूलचे साल 2022/2023 चे प्रवेश सुरु झाले आहेत.
तज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद, अतिशय शिस्तबद्ध व काटेकोर शाळाव्यवस्थापन,सलग 16 वर्षांचा दहावीचा 100% निकाल अशी वैशिष्ट्ये असणार्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावरदेखील जातीने लक्ष दिले जाते ही या शाळेची उल्लेखनीय बाब आहे.
आता सुरु झालेल्या प्रवेशांपैकी लोअर के.जी.प्रवेशपात्रतेसाठी जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 दरम्यान जन्मलेल्या बालकांनाच विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
सांस्कृतिक,सामाजिक,आरोग्य व क्रिडाविषयक शिक्षणासोबतच या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक शैक्षणिक व बौद्धिक समुपदेशनही केले जात असते.
तसेच वेळोवेळी शासनाच्या शैक्षणिक ध्येयधोरणांनुसारचे प्रकल्पही इथे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावय डिजिटल तथा ऑनलाईन शिक्षणाचीही सोय प्रशालेतर्फे उपलब्ध आहे.
सदर प्रशालेच्या प्रवेश पत्रिका म्हणजेच ॲडमीशन फाॅर्म दिनांक 01 फेब्रुवारीपासून प्रशालेच्या कार्यालयात सकाळी 09:30 ते 11:30 पर्यंत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी प्रशालेचा दूरध्वनी क्रमांक 02365253349 यांवरही संपर्क करता येऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी या गौरवशाली परंपरा असलेल्या प्रशालेत प्रवेश घेऊन आपल्या पाल्यांची एका सुखकर व शैक्षणिक आरोग्यदायी जीवनप्रवासाची सुरवात करावी व त्यांचे भविष्य सुदृढ करावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

25 वर्षांची गौरवशाली यशस्वी परंपरा असलेली ख्यातनाम शिक्षणसंस्था.

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथिल सुप्रसिद्ध शिक्षणसंस्था म्हणून नांवलौकीक असलेल्या रोझरी इंग्लिश स्कूलचे साल 2022/2023 चे प्रवेश सुरु झाले आहेत.
तज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद, अतिशय शिस्तबद्ध व काटेकोर शाळाव्यवस्थापन,सलग 16 वर्षांचा दहावीचा 100% निकाल अशी वैशिष्ट्ये असणार्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावरदेखील जातीने लक्ष दिले जाते ही या शाळेची उल्लेखनीय बाब आहे.
आता सुरु झालेल्या प्रवेशांपैकी लोअर के.जी.प्रवेशपात्रतेसाठी जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 दरम्यान जन्मलेल्या बालकांनाच विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
सांस्कृतिक,सामाजिक,आरोग्य व क्रिडाविषयक शिक्षणासोबतच या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक शैक्षणिक व बौद्धिक समुपदेशनही केले जात असते.
तसेच वेळोवेळी शासनाच्या शैक्षणिक ध्येयधोरणांनुसारचे प्रकल्पही इथे राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावय डिजिटल तथा ऑनलाईन शिक्षणाचीही सोय प्रशालेतर्फे उपलब्ध आहे.
सदर प्रशालेच्या प्रवेश पत्रिका म्हणजेच ॲडमीशन फाॅर्म दिनांक 01 फेब्रुवारीपासून प्रशालेच्या कार्यालयात सकाळी 09:30 ते 11:30 पर्यंत उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी प्रशालेचा दूरध्वनी क्रमांक 02365253349 यांवरही संपर्क करता येऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालकांनी या गौरवशाली परंपरा असलेल्या प्रशालेत प्रवेश घेऊन आपल्या पाल्यांची एका सुखकर व शैक्षणिक आरोग्यदायी जीवनप्रवासाची सुरवात करावी व त्यांचे भविष्य सुदृढ करावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांनी केले आहे.

error: Content is protected !!