धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ;महिलांसाठी हळदीकुंकू संभारभ…
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री माघी गणेश जयंती उत्सव २०२२ व श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन शुक्रवार ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्राम्हणदेव सेवा मंडळ , असलदे उगवतीवाडी येथे गणेश पुजन सकाळी ९ .३० ते १०.०० वाजता,सामूहीक अभिषेक सकाळी १० वाजता,श्री. सत्यनारायणाची महापुजा सकाळी १०.३० ते ११.३० वाजता,महाआरती ११.३० वाजता , महाप्रसाद दुपारी १ ते ३ वाजता,महिलांसाठी हळदीकुंकू संभारभ, दुपारी ३.०० ते ४.०० वाजता,खेळ पैठणीचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ४ ते ६ वाजता,सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते ७ वाजता,मान्यवरांचे सत्कार,सायंकाळी ७ ते ८ वाजता,सुमधुर संगीत भजन रात्रौ ९ वाजता,स्थानिक वारकरी भजने १० वाजता होणार आहेत.
तरी सर्वांनी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.सर्व कार्यक्रम शासनाच्या कोव्हीड १९ च्या सर्व अटी व नियमांचे पालन करुन होणार आहेत.