25.6 C
Mālvan
Monday, November 11, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

आंगणेवाडी  यात्रा नियोजनाचा प्रशासनातर्फे घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक आढावा.

- Advertisement -
- Advertisement -

आरोग्यविषयक सामाजिक नियम पाळून भाविकांना सुलभ दर्शन मिळण्यासाठी मंडळाचे नियोजन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आस्थेची सरिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव २४ फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आंगणेवाडी येथे सोमवारी यात्रा नियोजन बैठक पार पडली. यात्रेकरू भाविकांना सुलभ दर्शन मिळावे या दृष्टीने नियोजन करताना कोरोना नियमावलीचे पालन योग्यपद्धतीने करावे अशा सूचना सर्व विभागाच्या प्रशासन प्रमुखांना देताना यात्रा परिसराची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. बर्गे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पोलीस अधिकारी सचिन चव्हाण, सरपंच सौ पालव, तसेच आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रकाश आंगणे, अनंत आंगणे, बाबू आंगणे, सतीश आंगणे, दीपक आंगणे, नंदू आंगणे, रामदास आंगणे, सुधाकर आंगणे, रवी आंगणे यासह आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते. 
गतवर्षी केवळ आंगणे कुटुंबियांपुरता मर्यादित असलेला यात्रोत्सव यावर्षी  भाविकांच्याही उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून साजरा करण्याबाबत कश्या पद्धतीने नियोजन करता येईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 

मंडळाच्या वतीने ९ रांगांच्या माध्यमातून भाविकांना देवीचे दर्शन मिळणार आहे.मंदिरात जास्त गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करण्याच्या सूचना मंडळाला करण्यात आल्या. लक्षणे असणाऱ्या भाविकांची थर्मलगनच्या माध्यमातून तपासणी तसेच आवश्यकता वाटल्यास कोरोना तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागास सूचना दिल्या.आंगणेवाडी मंदिराकडे येणारे मालवण, कणकवली तसेच कणकवली हे तिन्ही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व ग्रामसडक योजना विभागाने सुस्थितीत ठेवावेत. 

आंगणेवाडीतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत निर्जंतुकीकरण करून ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे आदी सूचना देण्यात आल्या. यात्रोत्सव कालावधीत मोबाईल रेंजची संमस्या निर्माण होते याबाबत बीएसएनएल अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देताना नियोजन करण्याबाबत सांगण्यात आले.यात्रा कालावधीत अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका यांची व्यवस्था तसेच फिरत्या स्वरूपाची शौचालये, काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालय यांची उभारणी करणे. याबाबतही सूचना संबंधित प्रशासनास देण्यात आल्या. 

गतवर्षी  वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा कालावधीत दुकानांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, यावेळी दुकानांना परवानगी देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ता मार्ग सोडून दुकानांना परवानगी देण्याचे नियोजन करावे. वीज वितरणनेही योग्यती काळजी घेऊन दुकानांना वीजपुरवठा उपलब्ध करून घ्यावा अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 

आंगणेवाडी यात्रोत्सवात मोठया प्रमाणात चाकरमानी येतात. रेल्वे स्थानक मार्गावरून आंगणेवाडी पर्यंत शक्य असल्यास शिवशाही बस सोडण्याबाबत एसटी प्रशासनाने नियोजन करावे. तसेच आंगणेवाडी मंदिरापर्यंत मालवण कणकवली याठिकाणाहून बसेसचे नियोजन करावे अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या. यात्रा कालावधीत पोलीस प्रशासनाने योग्यतो बंदोबस्त तैनात ठेवावा. आंगणेवाडी यात्रा नियोजनाबाबत प्राथमिक स्तरावर आजची बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत देण्यात येणाऱ्या सूचना व नियोजन याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन कोणत्या प्रकारे अंमलबजावणी सुरू आहे याचा आढावा घेतला जाईल. तसेच आगामी काळात पालकमंत्री यात्रा नियोजनाबाबत बैठक घेतील अशीही माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!