चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे या वर्षीचा देण्यात येणारा कै.प्रतापराव केनवडेकर स्मृतीप्रित्यर्थचा आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जाही झाला आहे. आज ३१ जानेवारी रोजी कणकवली येथे होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यात याचे वितरण केले जाणार आहे.
केवळ व्यवसाय एवढेच उद्दिष्ट न ठेवता कोरोना महामारीत सामाजिक भावनेतून अनेकाधिक उपक्रमांनी सामाजिक क्षेत्रात आचरा व्यापारी संघटनेने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. याची दखल घेत जिल्हा व्यापारी महासंघाने या वर्षीचा कै प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार आचरा व्यापारी संघटनेला जाहीर केला आहे.
अभिनंदन.