शालेय भिंतींद्वारा समाज प्रबोधन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर (विशेषवृत्त) : समाजामधील सर्वांगीण सक्षमतेसाठी पूर्वीपासूनच प्रबोधन हा मार्ग संत,युगप्रवर्तक आणि समाजमार्गदर्शकांनी आदर्श म्हणून जपलेला व आखलेला आहे. प्रबोधनाचे महत्व कालानुरुप वाढतच आहे आणि त्याचे मार्ग,माध्यम किंवा पद्धतीही बदलत आहेत. असेच एक प्रबोधनाच अनोखे माध्यम एका शाळेत प्रबोधन सध्या समाज प्रबोधनाचा प्रयत्न करत आहे…ते माध्यम म्हणजे वाॅल…तथा भिंत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटव, नांदगांव शाळेतील भिंती समाजप्रबोधनाची कमाल करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी भिंत बोलकी झाल्याचीच सुखद व समाजसुखद भावना यामुळे निर्माण झाल्याचे चित्र शाळेत दिसत आहे.
“शाळेच्या इमारतीच्या बोलक्या भिंतीतून समाज प्रबोधनाचे काम ओटव नांदगाव शाळेने केले आहे .त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे ,”असे प्रतिपादन खुद्द नांदगांव सरपंच आफ्रोजा नावळेकर यांनी येथे केले.
मोफत गणवेश वितरण कार्यक्रम नुकताच जि.प.शाळा ओटव नांदगांव शाळेत नांदगाव सरपंच आफ्रोजा नावळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी प्रशालेच्या भिंती नव्याने रंगवताना समाज प्रबोधनात्मक चित्रे काढल्याबद्दल कौतुक करण्यात आले. व्यासपीठावर शा.व्य.समिती अध्यक्ष सौ.दिप्ती परब,गणेश बांदिवडेकर,समीर नांदगावकर,मांजरेकर,
आदि मान्यवर उपस्थित होते.स्वागत मुख्याध्यापक आनंद तांबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.रूपाली हुन्नरे यांनी केले. या प्रशालेतील भिंतीला पाहून सध्या सामाजिक स्तरावर कौतुकाने बोलले जात आहे की समाजप्रबोधनासाठी ओटव जि.प.शाळेतील “वाॅल करी कमाल…..!”
स्तुत उपक्रम. अभिनंदन.