बांदा विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत तेजस परब, भूषण सावंत यांची माहिती
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने १९ फ्रेब्रवारी रोजी शिवजंयती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल रखुमाई सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत तेजस परब व भुषण सावंत यांनी सांगितले. सदर स्पर्धा बांदा मर्यादित आहे. या विविध स्पर्धेत चित्रकला स्पर्धा रविवार दि.१३ फ्रेब्रवारी रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ येथे पहीली ते चौथी गट विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, पाचवी ते आठवी गट विषय – छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे, खुला गट विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व संवर्धन स्पर्धंकांना प्रथम क्रमांक रोख ५००, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, व्दितीय क्रमांक ३०० सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येईल. चित्रकला स्पर्धेसाठी संस्थेतर्फे कागद देण्यात येईल. रंग साहित्य स्वतः स्पर्धेकांनी आणावे. चित्रकला स्पर्धेसाठी रणजीत बांदेकर, जे.डी पाटील सर यांच्याशी संपर्क साधावा. वक्तृत्व स्पर्धा मंगळवार दि. १५ फ्रेब्रुवारी रोजी वेळ सायंकाळी ३.०० वाजता स्थळ जि.प. क्रेंद्र शाळा नं.१, गट पहीली ते चौथी विषय- महाराजांचे बालपण आणि मावळे, सादरीकरण वेळ पाच मिनिटे, गट पाचवी ते आठवी विषय- महाराजांची युध्दनिती ,
खुला गट विषय – महाराजांचे समाजकारण आणि राजकारणात
सदर या स्पर्धेसाठी भुषण सावंत, तेजस परब यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रांगोळी स्पर्धा दि. १८ फ्रेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता स्थळ जि.प.केंद्र शाळा नं.१ गट पाचवी ते सातवी विषय – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर
खुला गट विषय – शिवाजी महाराजांच्या जीवनावर
रांगोळी साहीत्य स्वतः स्पर्धेकांनी आणावे. यासाठी रणजीत बांदेकर, लक्ष्मण घोगळे यांच्याशी संपर्क करावा. वेषभुषा स्पर्धा दि. १९ फ्रेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थळ जि.प. क्रेंद्र शाळ नं १, गट, पहीली ते चौथी, पाचवी ते सातवी, खुला गट विषय- ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज/मावळे यासाठी संपर्क नारायण बांदेकर, संतोष मंजिलकर, पोवाडा स्पर्धा दि. १९ फ्रेब्रुवारी दुपारी तीन वाजता गट पहीली ते चौथी, पाचवी ते सातवी, खुला गट, सदर या स्पर्धेसाठी अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेच्या कार्यक्रमास मराठा समाज चे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी या पत्रकार परिषदेत रणजित बांदेकर, नारायण बांदेकर, अक्षय मयेकर, संतोष मंजीलकर, विवेक विर्नोडकर, अनुज बांदेकर, हेमंत बांदेकर, निलेश मोरजकर व शिवप्रेमी उपस्थित होते.