चिंदर | विवेक परब : वेंगुर्ले भाजपच्या वतीने मातोंड – पेंडुर गावामध्ये कुलदेवता मंदिर येथे दिव्यांगासाठी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमीत्त वेंगुर्ले मध्ये साई मंगल कार्यालयात दिव्यांगांचा मेळावा आयोजित केला होता, यावेळी काही दिव्यांगांना ब्लँकेट मिळाली नव्हती त्यांना त्यांच्या गावापर्यंत जाऊन ब्लँकेट देण्याचा मनोदय भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला होता, त्याचाच एक भाग म्हणून मातोंड – पेंडुर गावामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस तसेच कार्यक्रमाचे आयोजक ता.उपाध्यक्ष संतोष गावडे मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी भाजपा दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांगासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. तसेच दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता साईदरबार हाॅल मध्ये विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अंधांना पांढर्या काठीचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी संतोषी माणगांवकर, मुकेश घोगळे, विजय परब, करिष्मा परब, शैलेश सावंत, प्रशांत शिरोडकर, गोकुळा कवठणकर या दिंव्यांगांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मातोंड सो.सा.व्हाईस चेअरमन नारायण नाईक, उमेश दळवी, विजय नाईक, प्रकाश गावडे, मनोहर राऊत, आनंद शिरोडकर, शैलेश सावंत, प्रशांत घोगळे, भरत नेमण, सुनील गावडे इत्यादी उपस्थित होते.