शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश, निलेश राणेंना आमदार करण्याचा निर्धार.
ब्यूरो न्यूज : कसाल जिल्हा परिषद मतदार संघामधील गावराई येथे उबाठा गटाला खिंडार पडले आहे. युवा सेना विभाग प्रमुख साई वालावलकर यांच्या सोबत उ. बा. ठा. च्या अनेक पुरुष व महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गावराई येथे शाखाप्रमुख कृष्णा चिंदरकर यांच्या निवासस्थानी. शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत, कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी सिद्धेश शिरसाट, विभाग प्रमुख चंद्रकांत राणे, उपतालुकाप्रमुख अंकित नार्वेकर , उपविभाग प्रमुख विनय शिरोडकर महिला उपविभाग प्रमुख वेंगुर्लेकर मॅडम, शाखाप्रमुख कृष्णाजी चिंदरकर, यांच्या उपस्थितीत उ. बा. ठा. गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांनी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देऊन आपण सर्वांनी आपले भावी आमदार सन्माननीय निलेश राणे साहेब त्यांना कसाल जिल्हा परिषद मतदार संघातून सर्वात जास्त मतदान देऊन निवडून आणूया असा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला. साई वालावलकर, दत्तगुरु प्रकाश शिरोडकर, तुषार धाकू राऊत, धाकू महादेव राऊत, दशरथ जनार्दन जंगले, मंदार अविनाश मांजरेकर, जागृती विठ्ठल मांजरेकर, शिवाजी नाईक, रामचंद्र लवू गावडे , चंद्रकांत रामचंद्र गावडे, मधुकर जनार्धन काळे , महेश साबाजी गावडे, किरण गावडे यांनी प्रवेश केला.
हा कार्यक्रम सुनियोजन करून यशस्वी केल्याबद्दल शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाठ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.