नगरपरीषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलिस उप निरीक्षक संदीप खाडे, प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी , कर्मचारी, सामाजिक संस्था सदस्य व नागरीक यांची उपस्थिती.
नगरपरीषद अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह भव्य मोटरसायकल रॅली.
मालवण | प्रतिनिधी : बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सार्वत्रिक आणि प्रबुद्ध सहभागासाठी निवडणुकीत माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रबोधन करून मतदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. श्री. अनिल पाटील (भा. प्र. से.) यांच्या संकल्पनेतून मालवण नगरपरिषद क्षेत्रात मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झाल्टे, निवासी नायब तहसिलदार श्री. गंगाराम कोकरे, पोलीस उप – निरीक्षक श्री. संदीप खाडे, वाहतूक नियंत्रण पोलिस श्री.गुरुप्रसाद परब, मातृत्व आधार फाऊंडेशनचे हरीश उर्फ दादा वेंगुर्लेकर यांच्यासह या मतदार जनजागृती मोहिमेत विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवा मतदार, महिला मतदार, व नागरिक सहभागी झाले होते. दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी २६९- कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे या मतदान जनजागृती कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मतदार जनजागृतीसाठी अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात मालवण शहरातील देऊळवाडा नाका येथून झाली. पुढे एसटी स्टँड – भरडमार्गे बाजारपेठेतून फोवकांडा पिंपळ येथून पुढे नगरपरिषद येथे रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व रॅली पाहण्यासाठी गर्दी केली. मोटारसायकल रॅली पूर्ण झाल्यानंतर सर्व उपस्थितांना मतदान शपथ देण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम, मतदार सेल्फी पॉईंट इत्यादी माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. मतदान जनजागृतीपर घोषणा, जनजागृतीपर गीते यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर व्यापून गेला. तसेच मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य, नगरवाचन मंदिर व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वकृत्व स्पर्धा, स्विमिंग स्पर्धा अश्या विविध स्पर्धासहित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले व सर्व मतदारांना १००% मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले. यावेळी नगरपरीषद मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे यांनी या अभियाना अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा तसेच पोहायची स्पर्धा असे उपक्रम देखिल राबवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यावेळी नगरपरीषद मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे, मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झाल्टे, निवासी नायब तहसिलदार श्री. गंगाराम कोकरे, पोलीस उप – निरीक्षक श्री. संदीप खाडे, प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी, जिल्हा समन्वयक निखिल नाईक, प्रभारी रचना सहाय्यक सुधाकर पाटकर, नगरपरीषद वरीष्ठ लिपीक महेश पाटकर यांच्यासह वाहतूक नियंत्रण पोलिस श्री. गुरुप्रसाद परब व पोलिस विलास टेंबुलकर, दिनेश राऊत, मंदार केळुसकर, आरेकर मॅडम, अमोल काटवळ, राजा केरीपाळे, अनिकेत चव्हाण, खेमराज सावंत, भास्कर राऊत, सुभाष कुमठेकर, करुणा गांवकर, वरुणराज अभ्यंकर, मिथुन शिगले, महेश तळावडेकर, सुनील गरगटे, तसेच नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
जिल्हा समन्वयक निखिल नाईक यांनी उपस्थितांना मतदान प्रतिज्ञा संबोधन केले.