युवतीसेना प्रमुख अधिकारी शिल्पा यतीन खोत यांचा विश्वास.
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण युवतीसेना प्रमुख अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आमदार वैभव नाईक यांना सुसंस्कृत व सूज्ञ जनता आमदार वैभव नाईक यांना तिसर्यांदा निवडून देण्यासाठी आतुर असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रसिद्धी पत्रात त्यांनी म्हणले आहे की, मालवणमधील छत्रपती पुतळा कोसळणे ही सत्ताधार्यांचे अनावधान, बेफिकिरी की भ्रष्टाचार अशा शिवप्रेमींना व सामान्यांना चर्चा कराव्या लागणे यासारखी सत्ताधार्यांसाठी नामुष्की नाही. बेफिकिरी, अनावधान व भ्रष्टाचार या तीनही गोष्टी जनतेसाठी बाधक असतात. यापैकी काहीही घडले तरी त्याची नैतिक जबाबदारी घेत सत्ता सोडणे अपेक्षित असते असेही शिल्पा यतीन खोत यांनी नमूद केले आहे. त्यासंदर्भात वक्तव्ये, कारवाई वगैरे दिशाभूल करणारी होती की दिखावे होते हे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण नगरीत छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम जलद गतीने करण्यामागील उद्देश हे शिवशक्तीचा आदर करणारे नव्हते. त्याच्या उभारणीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता नव्हती. अख्ख्या जगात छत्रपतींचे लाखो पुतळे आहेत परंतु अशी बेफिकीरी कुठेच झालेली आढळत नाही अशी खंत शिल्पा खोत यांनी व्यक्त केली आहे.
प्रसिद्धिपत्रात शिल्पा खोत म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक हे छत्रपतींच्या अस्मितेला व जगदंबेच्या धगधगत्या मशालीला जपणारे आहेत. किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपतींच्या सन्मानाचा सन्मान करत त्यांनी सिंहासन घडवले. सुसंस्कृत, अभ्यासू, आश्वासक निष्ठावान म्हणजे आमदार वैभव नाईक यांनी १० वर्षे जनतेची शांती, समाधान व प्रगती कशात आहे याचाच विचार करुन विकास कामे केली आहेत असे शिल्पा यतीन खोत यांनी म्हणले आहे.
वाढता भ्रष्टाचार, वाढती महागाई, गद्दारी आणि छत्रपतींचे स्मारक कोसळण्याचं समर्थन करणाऱ्यांना जनतेने घरी बसवावे असे शिल्पा यतीन खोत यांनी म्हणले आहे. युवती, स्त्रिया तथा महिलांच्या सुरक्षिततेसाठी व निर्भयतेसाठी आमदार वैभव नाईक यांच्या मशालीवर मोहोर उमटवण्यासाठी कुडाळ – मालवण मधील प्रत्येक निष्ठावंत, सुसंस्कृत व सूज्ञ मतदार आतुर झाला आहे असे युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे.