मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : संपूर्ण देश मोठ्या उत्साहात आज प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामपंचायत तसेच श्री भगवती हायस्कूल येथे ध्वजवंदन करण्याचा सन्मान भारतीय सैन्य दलातील जवान रामचंद संतोष मुणगेकर या गावच्या सुपुत्राला देण्यात आला. रामचंद्र हा मराठा रेजिमेंटचा जवान असून त्याचे शालेय तसेच बारावी पर्यंतचे शिक्षण श्री भगवती हायस्कुल आणि स्व. विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज येथे झाले होते. सुट्टी निमित्त २६ जानेवारी रोजी सकाळीच गावी आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन ग्रामपंचायत कार्यालय व हायस्कूल येथे त्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. साक्षी गुरव, संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, उपसरपंच धर्माजी आडकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत व भगवती हायस्कुल येथे रामचंद्र मुणगेकर याचा सत्कार करण्यात आला.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -