मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजन.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री शिवाजी वाचन मंदिर काळसे या सार्वजनिक वाचनालयाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच केशव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रंथालयाचे सेक्रेटरी श्री जयवंत केळुस्कर, माजी सरपंच सुवर्ण काळसेकर , पोलीस पाटील विनायक प्रभू, सोसायटी चेअरमन अण्णा गुराम , संचालक मनिष सातार्डेकर , योगेश राऊळ , काळसे हायस्कूल मुख्याध्यापक किशोर वालावलकर , शिक्षक पेडणेकर सर , माईणकर मॅडम , आचरेकर मॅडम , परब सर , ग्रंथालय कर्मचारी चारुलता काळसेकर , शिवनंदन प्रभु, हरेष आंग्रे तसेच ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केले. सदर ग्रंथ प्रदर्शनाला गावातील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेक्रेटरी जयवंत केळुसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.