युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती
चिंदर | विवेक परब : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट च्या पंचवार्षिक निवडणूकीचा महाविकास आघाडी पुरस्कृत संकल्प पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, पॅनल प्रमुख तथा जि. प. सदस्य संजय आग्रे, महाविकास आघाडी चे उमेदवार संतोष टक्के, सचिन तायशेटे, रंजन नेरुरकर, बबनशेठ पवार, सुंदर पारकर, राजू पावसकर, रमेश भोगटे, आनंद मर्ये, सुहास मोदी, शेखर लिंग्रस, अविनाश सापळे, राजू पटेल, सुभाष सावंत, संदेश पटेल तसेच सुरेश टक्के, श्याम भोवड, बंटी उरणकर, पवन भोगले, सिद्धेश राणे, प्रकाश वाघेरकर, पिंटू पटेल, राजेश शिरोडकर, राजन नानचे, युवासेनेचे सौरभ सुतार, राज सावंत, शुभम लाड, प्रवीण पडेलकर, निनाद पारकर, ओंकार हाऊळ, सागर वाळवे, प्रथमेश पारकर, मल्हार कल्याणकार, आदेश म्हसकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.