मालवण | वैभव माणगांवकर : मालवण शहरात देऊळवाड्यातील आडारी रोड परिसरात सध्या सरपटणाऱ्या श्वापदांचा वावर वाढलेला आहे. काल देऊळवाडा परिसरात ५ फुटी अजगर आढळला. हा अजगर प्राणी क्रिकेट मैदानाच्या जाळ्यात अडकलेला होता. स्थानिक लोकांच्या महितीनुसार हा अजगर २ दिवसांपासून त्या जाळ्यात दयनीय अवस्थेत अडकला असावा. त्याला सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी प्राणी मित्र हर्षल मालंडकर यांना संपर्क केला. हर्षल व त्यांचे संघसहकारी घटना स्थळी पोचले.
प्रथमदर्शनी नागरिक व प्राणीमित्र यांना अजगराची अवस्था बघून तो मृत असल्याचे जाणवले परंतु पूर्ण पाहणी केली असता तो अजगर जिवंत असल्याची माहिती प्राणी मित्र हर्षल मालडकर यांनी दिली. या नंतर त्या जीवित अजगराला त्या जाळ्यातून कोणतीही इजा न होता मुक्त करण्यात आले व त्याला सुरक्षित वन अधिवासात सोडण्यात आले. याबद्दल प्राणी मित्र हर्षल मालंडकर, सुमंत जोशी आणि निलेश गवंडी या सर्वांचे स्थानिक लोकांकडून आभार मानण्यात आले.