चिंदर | विवेक परब :सलग अकरा वर्षे आचरा भागातील बालवाचकांना वाचनप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न कराणारे आचरा गावचे सुपूत्र पराग नलावडे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्या कडून काढण्यात आले आहेत.
साने गुरुजी जयंतीचे औचित्य साधून रामेश्वर वाचनमंदिर तर्फे दरवर्षी बालवाचक वाचनवृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.आचरा गावातील मुलांना वाचन प्रवाहात आणून त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पराग नलावडे या मुलांची वर्गणी स्वतः भरुन त्यांना वाचनालयाचे सभासद बनवत असतात. यावर्षी ही आचरा गावातील १०६ विद्यार्थ्यांची वार्षिक वर्गणी भरून त्यांना वाचनप्रवाहात आणले आहे. त्यांच्या या अनोख्या दातृत्त्वाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सदस्य उर्मिला सांबारी, अशोक कांबळी, दिपाली कावले,भिकाजी कदम,विरेंद्र पुजारे,ग्रंथपाल विनिता कांबळी तसेच सांस्कृतिक समिती कर्मचारी वर्ग यांच्या कडून धन्यवाद व्यक्त केले जात आहेत.