सत्यनारायण पूजेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात;श्री दत्त माऊली पारंपारिक दशावतार नाटय मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग लक्षवेधी..
नांदगाव / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : ‘नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेच्यावतीने’ प्रतिवर्षीप्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी नांदगाव संन्मित्र रिक्षा संघटनेच्यावतीने पत्रकार, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांचा अध्यक्ष विलास कांडर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.श्री दत्त माऊली पारंपारिक दशावतार नाटय मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग लक्षवेधी ठरला.
यावेळी सन्मित्र रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष मोहम्मद काझी, खजिनदार इकबाल बटवाले, सुरेश मोरजकर, दिलीप डामरे,देऊ डामरे,सुरेश लोके, सुनील बोभाटे, दिलीप बापर्डेकर,अजय घाडी,संतोष पोकळे,मंगेश परब,अनिल गुरव, संजय जेठे आदींसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाई मोरजकर,हनुमंत वाळके,मनोहर खोत,सरपंच मनाली गुरव व अन्य मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बुवा उद्धव कांडर, बुवा संतोष मिराशी यांनी सत्यनारायण चरणी भजन सेवा केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्यनारायणाची महापुजा, महाप्रसाद, भजन, हळदी कुंकु, श्री दत्त माऊली पारंपारिक दशावतार नाटय मंडळ वेंगुर्ला यांचा महापौराणिक नाट्यप्रयोग हे कार्यक्रम पार पडले. सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव अध्यक्ष विलास कांडर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत .