आम.नितेश राणेंच्या आमदार फंडातून १० लाखांचा निधी..
कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली तालुक्यातील असलदे मधलीवाडी येथे कणकवली देवगडचे आमदार नितेश राणेंच्या आमदार फंडातून खडीकरण डांबरीकरण रस्त्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाला. या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. हर्षदा वाळके, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, सोसायटी माजी चेअरमन प्रकाश परब, ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी,संचिता नरे, परशुराम परब , ग्रामसेवक आर.डी.सावंत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाजी शिंदे, सोसायटी व्हा. चेअरमन दयानंद हडकर, पोलिस पाटील सावित्री पाताडे, रघुनाथ लोके , महेंद्र हडकर , रामदास परब, मिलिंद डगरे ,विजय आचरेकर,देवू लोके , कमलेश पाटील, योगेश सदडेकर ,किरण हडकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत व भाजप तालूकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आम.नितेश राणेंच्या आमदार फंडातून रस्ता पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.