25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नटसम्राटाच्या जीवन काळजाचा आरसा…हळवलवासियांनी जगून जपला त्याच्या इच्छेचा वारसा…! (सिनेपट)

- Advertisement -
- Advertisement -

श्रद्धेने जगलेला कलाआत्मा जपायचा एक कला शैक्षणिक आदर्श..!

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) विशेषवृत्त : “ज्या जागेवर मी पहिला चेहर्याला अभिनय कला सादरीकरणासाठीचा पहिला रंग लावला त्याच जागेवर मला अखेरचा रंग लावून रंगमचावरून निवृत्ती घ्यायची आहे “,असे सांगून दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेणाऱ्या थोर दशावतारी कलावंत बी. के. तांबे यांच्या स्वप्नाची पूर्तता करत हळवल ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
हळवल गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य शासन लोककला पुरस्कार विजेते बी के तांबे यांच्या स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम जि. प. शाळा हळवल क्र.१ च्या समोर पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ हळवल सरपंच दिपक गुरव यांच्या शुभ हस्ते सिने अभिनेते अभय खडपकर, डॉ दिलीप घाडिगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर व्यासपीठ शुभारंभ प्रसिद्ध मूर्तिकार दशावतारी हार्मोनियम वादक अरुण राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी सभापती मधुकर सावंत, वारकरी सांप्रदाय जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, भास्कर राणे, राजू राणे, संतोष गुरव, मारुती सावंत, शशिकांत राणे, अनंत राणे, विठोबा राणे, प्रदीप गावडे, जयसिंग राणे, रामचंद्र तांबे, दयानंद राणे आदींसह हळवल ग्रामस्थ व बी के तांबे प्रेमी उपस्थित होते.

१६ एप्रिल २०२१ रोजी बी के तांबे यांनी सायंकाळी ८ वाजल्यापासून गावातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना फोन करून मी ज्या जागेवर रंग लावून दशावतारी कलेची सुरवात केली व भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाची स्थापना झाली. त्याच जागेवर मला अखेरचा रंग लावून रंगमचारून निवृत्ती घ्यायची आहे. व मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा माझ्या गावातील कलाकार व त्यांच्या कुटुंबीयांचा मला सन्मान करायचा आहे. असे सांगितले मात्र दुर्दैवाने १७ एप्रिल रोजी पहाटे बी के तांबे यांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर आपल्या नटसम्राटाची अखेर ची इच्छा पूर्ण करण्याचे हळवल ग्रामस्थांनी ठरविले व २० जानेवारी २०२२ रोजी स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात करताना स्वप्नपूर्ती म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रास्ताविकात मधुकर सावंत यांनी सांगितले तर बी के तांबे यांचा जीवनपट सादर करत सिने अभिनेते अभय खडपकर यांनी उपस्थित बी के तांबे प्रेमींना भावुक केले. स्वप्नपूर्ती कार्यक्रमात हळवल गावातील जेष्ठ दशावतारी कलाकरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संचात राजा इंद्रसेन सत्व परीक्षा हा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नाट्य प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गावडे यांनी केले.
‘सगळेच स्वप्नवत…पण सत्यवचनी घटनेप्रमाणे घडत गेले आणि बि के तांबेरुपी कलेचा सोनचाफा हळवलवासियांनी एका वेगळ्याच कला अत्तरकुपीत दरवळवून रसिकमनालाही सोन्याच्या मनाचे कलादालन दाखवले’, अशीच काहीशी प्रतिक्रिया या संपूर्ण कलाविष्कारासाठी होत राहील.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्रद्धेने जगलेला कलाआत्मा जपायचा एक कला शैक्षणिक आदर्श..!

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) विशेषवृत्त : "ज्या जागेवर मी पहिला चेहर्याला अभिनय कला सादरीकरणासाठीचा पहिला रंग लावला त्याच जागेवर मला अखेरचा रंग लावून रंगमचावरून निवृत्ती घ्यायची आहे ",असे सांगून दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेणाऱ्या थोर दशावतारी कलावंत बी. के. तांबे यांच्या स्वप्नाची पूर्तता करत हळवल ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
हळवल गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य शासन लोककला पुरस्कार विजेते बी के तांबे यांच्या स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम जि. प. शाळा हळवल क्र.१ च्या समोर पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ हळवल सरपंच दिपक गुरव यांच्या शुभ हस्ते सिने अभिनेते अभय खडपकर, डॉ दिलीप घाडिगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर व्यासपीठ शुभारंभ प्रसिद्ध मूर्तिकार दशावतारी हार्मोनियम वादक अरुण राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी सभापती मधुकर सावंत, वारकरी सांप्रदाय जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, भास्कर राणे, राजू राणे, संतोष गुरव, मारुती सावंत, शशिकांत राणे, अनंत राणे, विठोबा राणे, प्रदीप गावडे, जयसिंग राणे, रामचंद्र तांबे, दयानंद राणे आदींसह हळवल ग्रामस्थ व बी के तांबे प्रेमी उपस्थित होते.

१६ एप्रिल २०२१ रोजी बी के तांबे यांनी सायंकाळी ८ वाजल्यापासून गावातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना फोन करून मी ज्या जागेवर रंग लावून दशावतारी कलेची सुरवात केली व भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाची स्थापना झाली. त्याच जागेवर मला अखेरचा रंग लावून रंगमचारून निवृत्ती घ्यायची आहे. व मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा माझ्या गावातील कलाकार व त्यांच्या कुटुंबीयांचा मला सन्मान करायचा आहे. असे सांगितले मात्र दुर्दैवाने १७ एप्रिल रोजी पहाटे बी के तांबे यांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर आपल्या नटसम्राटाची अखेर ची इच्छा पूर्ण करण्याचे हळवल ग्रामस्थांनी ठरविले व २० जानेवारी २०२२ रोजी स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात करताना स्वप्नपूर्ती म्हणजे नेमकं काय हे आपल्या प्रास्ताविकात मधुकर सावंत यांनी सांगितले तर बी के तांबे यांचा जीवनपट सादर करत सिने अभिनेते अभय खडपकर यांनी उपस्थित बी के तांबे प्रेमींना भावुक केले. स्वप्नपूर्ती कार्यक्रमात हळवल गावातील जेष्ठ दशावतारी कलाकरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संचात राजा इंद्रसेन सत्व परीक्षा हा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नाट्य प्रयोगाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गावडे यांनी केले.
'सगळेच स्वप्नवत…पण सत्यवचनी घटनेप्रमाणे घडत गेले आणि बि के तांबेरुपी कलेचा सोनचाफा हळवलवासियांनी एका वेगळ्याच कला अत्तरकुपीत दरवळवून रसिकमनालाही सोन्याच्या मनाचे कलादालन दाखवले', अशीच काहीशी प्रतिक्रिया या संपूर्ण कलाविष्कारासाठी होत राहील.

error: Content is protected !!