बांदा | राकेश परब : मुंबई येथील दी बॉम्बे आर्ट सोसायटी बांद्रा येथे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित गणांक गणेश मुर्ती प्रदर्शनात सिंधुदुर्गातून मडुरा येथील गणेशमुर्ती कलाकार शशिकांत परीट यांनी आपला ठसा उमटविला आहे. प्रदर्शनातील परीट यांच्या गणेशमूर्तीचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी विशेष कौतुक केले.
बांद्रा – मुंबई येथील गणेश मुर्ती प्रदर्शनासाठी सिंधुदुर्गातून मडुरा येथील शशिकांत परीट यांची निवड झाली होती. त्यांनी साकारलेली शंकर – पार्वती व गणपती ही मूर्ती सर्वच कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत होती. प्रदर्शनाचे उद्घाटन आम.आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. शशिकांत परीट यांच्या गणेशमूर्तीचे त्यांनी खास कौतुक केले. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राम पंडित यांनीही परीट यांच्या कलेचे कौतुक केले.
या प्रदर्शनात राज्यभरातून ७० गणेश मूर्ती कलाकार सहभागी झाले होते. शशिकांत परीट यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.