ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या पार गेली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज ४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २२५ वर पोहोचली आहे. तर आज ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पॉजिटीव्ह आलेल्यांमध्ये देवगड तालुक्यातील ५ , दोडामार्ग ३ , कणकवली २ , कुडाळ १२ , मालवण ५ , सावंतवाडी १० , वैभववाडी १, वेंगुर्ला २, जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे .