मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडाचापाट येथील आदिशक्ती स्वयंभू श्री देवी शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रौत्सव १७ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. १६ जानेवारी रोजी स. १०.०० वा. जलाभिषेक (देवीच्या पाषाणावर होईल) नामस्मरण / महाआरती रोजी सायं. ७.०० वा. होणार आहे.
१७ जानेवारी रोजी स. ८ ते १२.३० वा. कलशारोहण वर्धापन दिन पूजाअर्चा आणि महाप्रसाद सायं. ७.०० वा. श्री देवी भराडी प्रासादिक भजन मंडळ मसदे, रात्रौ ११.०० वा.
पूजापाठ व पालखी सोहळा तद्नंतर (लोकजागर) आईचा गोंधळ.
१८ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. मोफत आरोग्य तपासणी शिबीर महाराष्ट्र शासन, दुपारी २.०० वा.
हळदीकुंकू, पाककला / विविध स्पर्धा,
सायं. ७.०० वा.नवपाटवाडी ग्रामविकास प्रासादिक भजन मंडळ, वडाचापाट, रात्रौ ९.३० वा. नृत्यस्पर्धा-२०२२ (रेकॉर्ड डान्स आधारीत)
१९ जानेवारी रोजी स. ८ ते १२.३० वा.विश्वकल्याणार्थ शक्तीपीठ नवदुर्गा चंडी महायाग/महाप्रसाद,
स. १०.०० वा.रक्तदान, जनजागृती व माहिती शिबीर महाराष्ट्र शासन,
सायं. ७.०० वा. प्राथमिक शिक्षक कलामंच प्रासादिक भजन मंडळ कुडाळ, रात्रौ ८.३० वा. समाज प्रबोधनपर कीर्तन ह.भ.प. गायकवाड महाराज फोंडा, रात्रौ ११.०० वा.पूजापाठ व पालखी सोहळा, तद्नंतर चेंदवणकर-गोरे दशावतार मंडळनिर्मित नाट्यप्रयोग.
२० जानेवारी रोजी दुपारी ४.०० वा. संगीत भजन स्पर्धा २०२२, २१ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा कोकुयो कॅम्लिन पुरस्कृत शैक्षणिक उपक्रम स्पर्धा, सायं. ६.०० वा.श्री पूर्णानंद स्वामी प्रासादिक भजन मंडळ, गोळवण-बोरकरवाडी / दिपोत्सव हरीनाम संकीर्तन-श्रीमद्भागवत कथाव्यास- श्री श्रीरामचंद्र दास (इस्कॉन) (प.पू. श्री. राधागोविंद गोस्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य), रात्रौ १०.०० वा.बक्षीस वितरण,
रात्रौ ११.०० वा.पूजापाठ व पालखी सोहळा. मोफत वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन डॉ. सोनाली आ. फोंडगे, तसेच नेत्रचिकित्सा व अल्पदरात चष्मा वाटप मंगळवार, बुधवारी करणार आहेत. कोविड- १९ संदर्भात शासनाच्या नियम व अटींच्या अधिन राहून कार्यक्रमात बदल अथवा रद्द करण्याचा सर्वाधिकार राखून ठेवल्याची माहिती श्रीक्षेत्र वडाचापाट ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आली आहे.