नक्षत्राचं देणं काव्यमंचची कव्यमैफल उत्साहात संपन्न
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : नक्षत्राचं देणं काव्यमंच संपूर्ण महाराष्ट्रा बाहेर राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे ( वादळकर) यांच्या विविध उपक्रमांनी घौडदौड करीत आहे. कवी हा जगताचा धनी या पंक्तीप्रमाणे आपण जे लिहाल ते अचुकच असावे. निर्भीडपणे आपण सतत लिहीत राहा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कवी उदय सर्पे यांनी येथे केले नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र या काव्यमंचाच्या २३ व्या वर्धापन दिना निमित्त गोविंद सुपर मार्केट ओरोस येथे जिल्हास्तरीय काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी मंचाचे जिल्हाध्यक्ष, कवी श्री.उदय सर्पे होते. प्रमुख पाहुणे कवी सुरेश पवार हे होते सूत्रसंचालन मंचाचे तालुकाध्यक्ष कवी नरेंद्रकुमार चव्हाण यांनी केले. कविता जीवनाला प्रगतीपथावर नेण्याचे काम करते नाते दृढ करते असे म्हणून आपल्या स्वरचित ओवीनेकाव्यमैफिलीचा प्रारंभ कवी सुरेश पवार यांनी केला.काव्यमैफलीत नवोदित व जून्या कवी कवयित्रींनी भाग घेतला. सर्व कवींना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्साही वातावरणात कविता सादर केल्या.कवी राजेंद्र गोसावी, श्री.मधुकर जाधव , श्री.मनोहर सरमळकर ,श्री.उदय दळवी, श्री.दिलीप चव्हाण,श्री.दिपक म्हाडदळकर, कवयित्री सौ.प्रगती पाताडे , कु.विश्वा वालावलकर यांनी दर्जेदार कविता सादर केल्या. सर्वांचे आभार कवी नरेंद्रकुमार चव्हाण यांनी मानून काव्यमैफलची सांगता झाली.