मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा मालवणचा स्नेह मेळावा कांदळगाव येथील श्री संजय गोपाळ मराठे यांच्या घरी श्री आशिष आपटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी एकूण ८५ सदस्य उपस्थित होते.श्री गणेश पूजन , श्री परशुराम महाराज मूर्ती पूजन, गोपूजन विधीने संमेलनाला सुरुवात झाली. यजमानपद सौ व श्री आनंद पटवर्धन तसेच पौरोहित्य श्री गणेश नातू यांनी सांभाळले.संमेलनाचे दीप प्रज्वलन श्री भालचंद्र केळकर, श्री आशिष आपटे, श्री मंदार सरजोशी, श्री गणेश नातू, श्री सतीश वझे यांच्या हस्ते झाले. यानंतर सामूहिक रित्या श्री अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. तसेच स्तोत्रपठण स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षण श्री शेवडे गुरुजी आणि श्री मुणगेकर गुरुजी यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री चंद्रकांत गोखले यांनी ब्राह्मण ज्ञातीला आचार ,विचार ,संस्कार, धार्मिक दृष्टिकोन याबद्दल मार्गदर्शन केले.श्री मंदार माईणकर यांनी आकाश दर्शन बद्दल माहिती दिली. श्री निलेश सरजोशी यांनी कुबेर कुंभ बद्दल संपूर्ण नियोजन आणि माहिती दिली. श्रीपाद गिरसागर सर यांनी पंचद्रवीड पतसंस्था बद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यवाह श्री देवस्थळी सर यांनी जिल्हा संमेलनाविषयी माहिती दिली. यंदाचा संवत्सर याग मसुरा विभागात संपन्न होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील तालुका संमेलन कट्टा विभागात होणार असल्यामुळे कट्टा विभाग अध्यक्ष श्री स्वप्निल आपटे यांनी संमेलनाचे आमंत्रण स्वीकारले.सुत्रसंचलन ऋतुजा केळकर, प्रास्ताविक अर्चना हर्डीकर यांनी केले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -