मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : या प्रशालेचे बरेच विध्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. कै बापूसाहेब पंतवालावलकर यांनी शिक्षणाची व्यवस्था याठिकाणी उपलब्ध केल्याने चांगले शिक्षण घेता येत आहे. यापुढील काळात सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असेल. जीवनात यश मोठे मिळवा आणि हे सर्व होत असताना आपल्या शाळेला मात्र विसरू नका असे प्रतिपादन संस्था उपाध्यक्ष सुरेश बांदेकर यांनी येथे केले. श्री भगवती हायस्कुल व कै वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस मुणगे येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्ष कै. बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या जन्मदिनी सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रजवलन करून झाला. कै बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे. यशा मध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. शालेय जीवनात ध्येय मोठी ठेवा. स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी व्हा! असे आवाहन शालेय समिती अध्यक्ष निलेश परुळेकर यांनी केले. यावेळी प्र मुख्याध्यापक प्रसाद बागवे, सदस्य वसंत गुरव, विजय पडवळ, श्रीमती एम बी कुंज, सौ गौरी तवटे, बाबाजी सावंत, हरीश महाले, स्वप्नील कांदळगावकर, एन जी वीरकर, एन एल बागवे आदी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रसाद बागवे तर सुत्रसंचलन व आभार सौ गौरी तवटे, श्रीमती एम. बी. कुंज यांनी मानले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -