आचरा/ विवेक परब : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर पालकरवाडी, ता-मालवण शाळेची विद्यार्थिनी दुर्गा श्रीपाद म्हापसेकर हिने जवाहर नवोदय परीक्षा 2021 मध्ये उज्वल यश संपादन केले असून सांगेली तालुका सावंतवाडी येथे इयत्ता सहावी साठी तिची निवड झाली आहे. लहान पणा पासूनच हुशार असणाऱ्या दुर्गा हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वर्गशिक्षक श्री शिवानंद ह.सोलापुरे व श्री नंदकुमार जुंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने परीक्षेचा कसून सराव केला. तिच्या या यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने साहेब, विस्ताराधिकारी श्री.उदय दिक्षित, केंद्रप्रमुख श्री.प्रसाद चिंदरकर, सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्राम पंचायत सदस्य सौ.स्वरा पालकर, शाळा व्यव.स.अध्यक्ष सौ.दिक्षा पालकर, शिक्षण प्रेमी श्री रविंद्र लब्दे, शेखर पालकर, सौ.मनवा मिलिंद चिंदरकर व चिंदर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.